ठाणे : मेट्रोचे काम, रस्ते रुंदीकरण, खड्डे आणि पाऊस अशा चारही कारणाने ठाण्याला सध्या वाहतूक कोंडीने घेरले आहे. ठाण्यातील प्रवास हा संथ गतीने सुरू असल्याने अखेर वाहतूक विभागालाच घोडबंदर दिशेने महामार्गाचा वापर टाळा, पर्यायी अंतर्गत रस्ते वापरा, असे आवाहन करण्याची वेळ ओढवली आहे.
ठाण्याच्या वेशीवर असलेल्या आनंद नगर टोलनाक्यापासून वाहतूक कोंडीला सुरुवात होत आहे. येथील कोपरी उड्डाणपुलाचे रुंदीकरण झाले आहे; मात्र आठ मार्गिका तयार केल्यानंतरही आता त्यापैकी दोन मार्गिकेवर आनंदनगर ते साकेत पूर्व द्रुतगती उन्नत मार्गासाठी मार्गरोधक उभारले आहेत. त्यामुळे अंतर्गत मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे गोखले रोड, राम मारुती रोड अशी कसरत करत तीन हात नाका गाठावा लागत आहे, पण येथून पुढे घोडबंदरमार्गे प्रवास करताना अधिक कोंडीचा सामना सध्या चालकांना करावा लागत आहे.
Railway Local News: पती गाडीतून उतरला, पत्नी आतच, घाबरून धावत्या लोकलमधून उडी मारली, इतक्यात पोलीस देवदूत बनला अन्...घोडबंदर मार्गावर मेट्रोचे काम जोरात सुरू आहे. त्यासाठी वाहतूक विभागाकडून अनेकदा मार्ग बंद ठेवले जात आहेत. त्यात सेवा रस्ते मुख्य रस्त्यांमध्ये समाविष्ट करण्याचे काम एमएमआरडीएकडून सुरू आहे. हे काम करताना नव्याने जलवाहिनी आणि गॅसवाहिनी टाकण्याची कामेही सुरू आहेत. त्यामुळे सेवा रस्त्यांवर चिखल-माती पसरली आहे. यात खड्ड्यांची भर पडली आहे. शहरातील मुख्य रस्ते, महामार्गावर खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजवण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली होती, पण पावसामुळे वरवरची मलमपट्टी उखडून जात आहे.
उड्डाणपुलावरही खड्डे पडल्याने वाहनचालकांची अवस्था बिकट झाली आहे. यासर्व कारणांमुळे ठाण्यातील वाहतूक मंदावली असून, गेल्या काही आठवड्यांपासून कोंडीचे ग्रहण सुटत नसल्याचे चित्र दिसत आहे. ही कोंडी फोडण्यात वाहतूक विभागालाही आता अपयश आल्याचे दिसते.
वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कासारवडवली पुलाच्या सेवा रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथे वाहतूक धीम्यागतीने सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरून वडवली, आनंदनगर, हिरानंदानीकडे जाताना वाहनचालकाांनी कोलशेतमार्गे ब्रम्हांड सर्कल, विजय गार्डन, आयुक्त बंगला असा प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. तसेच घोडबंदर मार्गाचा प्रवास टाळण्याची विनंती केली आहे.
Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा अंतर्गत रस्त्यांवरही कोंडीघोडबंदर मार्ग टाळण्यासाठी वाहनचालक मोठ्या प्रमाणात अंतर्गत रस्त्यांचा वापर करत आहेत. त्यामुळे कापूरबावडी जक्शनपासूनच त्यांना कोंडीचा सामना कारावा लागत आहे. त्यात विरुद्ध दिशेने वाहन वळवण्यात येत असल्याने कोंडीत भर पडत असल्याचे चित्र दिसत आहे.