गोवंडी: कोल्ड ड्रिंकमधून विष देऊन 16 वर्षीय मित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उंदीर मारण्याचं औषध कोल्ड ड्रिंकमधून देऊन ही हत्या केली आहे. मित्र बोलत नसल्याच्या रागातून शाहिद शेख उर्फ सोनूची हत्या केलीआहे. गोवंडीच्या शिवाजीनगर येथील हा धक्कादायक प्रकार आहे. शिवाजीनगर पोलिसांनी जिशान शब्बीर अहमद, वय वर्षे 19 याला अटक केली आहे. काही महिन्यांपूर्वी कोणालाही न सांगता जिशान शाहिदला घेऊन नागपूरला गेला होता. घरी आल्यानंतर शाहिदच्या वडिलांनी दोघांना एकमेकांशी न बोलण्याची ताकीद दिली होती. त्यावर जिशानने शाहिदच्या वडिलांना शिवीगाळ केली होती. मात्र चुलत भाऊ असल्याने वडिलांनी जिशानची तक्रार करणे टाळले होते. त्यानंतर शाहीदने जिशानशी बोलणं कमी केलं होतं, त्याच रागातून ही घटना घडली असल्याचं समोर आलं आहे.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांच्या तपासात कोल्ड ड्रिंकमधून मित्रानेच मिसळल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्यासोबत नीट बोलत नाही, भेटत नाही म्हणून त्याने मित्राची हत्या करून इतर दोन तरूणांनी कोल्ड ड्रिंक दिल्याचा बनाव त्याने रचला होता. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली. मित्र टाळत असल्याच्या रागातून शेतात उंदीर व किटे मारण्यासाठी वापरण्यात येणारे किटकनाशक शीतपेयातून दिल्याचे तपासात समोर आले आहे. अटक आरोपी हा मृत मुलाचा चुलत काका आहे. कोल्ड ड्रिंक पिल्यानंतर शाहिद शेख उर्फ सोनू बेशुद्धावस्थेत पडला होता. मुलाच्या वडिलांनी स्थानिक डॉक्टरांना घरी बोलावले. त्यांनी तपासणी करून सोनूचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
शाहिद शेख उर्फ सोनू याच्या मृत्यूप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली होती. त्यावेळी पोलिसांनी त्याच्यासोबतच कोल्ड ड्रिंक पिलेल्या आणि आपल्यालाही त्रास होत असल्याचं सांगणाऱ्या जिशानशी चौकशी केली असता दोन मित्रांनी त्याला पिण्यासाठी स्टिंग हे कोल्ड ड्रिंक दिले होते. पण माझी कोल्ड ड्रिंक पिण्याची इच्छा नसल्यामुळे मी सोनूला दिले. त्या बाटलीतील सर्वाधीक कोल्ड ड्रिंक सोनू प्यायला व त्यानंतर दुपारी तो माझ्या घरी झोपला. मी थोडेसेच कोल्ड ड्रिंक प्यायलो व झोपलो. पण माझ्या पोटात दुखू लागल्यामुळे मला जाग आली. त्यावेळी मी सोनूला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो उठला नाही, असंही त्यानं सांगितलं.
जिशाननेच सोनूची हत्या केल्याचे संशय निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी जिशानवर उपचार होईपर्यंत वाट पाहिली. त्याच्यावर उपचार झाल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्यावेळी त्याने आपणच सोनूला कोल्ड ड्रिंकमधून वीष दिल्याचे कबुल केले. तसेच आपल्यावर संशय येऊ नये, म्हणून थोडेसे आपण प्यायल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सोनूच्या वडिलांच्या तक्रारीवरून याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
आणखी वाचा