CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO
Saam TV July 06, 2025 03:45 PM

सध्या सर्वत्र कॉमेडीचे वारे वाहू लागले आहे. लवकरच 'चला हवा येऊ द्या 2' (Chala Hawa Yeu Dya 2) या शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते या कार्यक्रमासाठी खूप उत्सुक आहेत. लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेकांचा'चला हवा येऊ द्या' आवडता कार्यक्रम आहे. चाहते आता कार्यक्रमातील कलाकारांची आतुरतेने वाट पाहत आहेत. याचा एक खास प्रोमो समोर आला आहे. 'चला हवा येऊ द्या 2'मध्ये कॉमेडीच्या किंगची धमाकेदार एन्ट्री पाहायला मिळणार आहे.

झी मराठी वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची एक झलक पाहायला मिळत आहे. लाल रंगाचा सूट, वाढवलेले केस- दाढीमध्ये हा अभिनेता दिसत आहे. त्यांच्या हातात बंदूक देखील पाहायला मिळते. व्हिडीओला हटके कॅप्शन देण्यात आले आहे. "खबर आहे गावागावात, कॉमेडीचाडॉन परत येतोय थाटात! कॉमेडीचं गॅंगवार आता सुरू होणार..." असे लिहिलं आहे.

व्हिडीओतला कॉमेडी किंग दुसरा-तिसरा कोणी नसून मराठमोळा अभिनेता प्रियदर्शनजाधव (Priyadarshan Jadhav) आहे. चाहते त्याच्या एन्ट्रीने खूपच खुश झाल्याचे पाहायला मिळत आहेत. प्रियदर्शनने 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या सीझनमध्ये देखील प्रेक्षकांना खूप खळखळवून हसवले आहे. त्याचा विनोद आणि डायलॉगचे चाहते दिवाने आहेत.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

सध्या 'चला हवा येऊ द्या 2'चे ऑडिशन सुरू आहे. या शोमध्ये श्रेया बुगडे, कुशल बद्रिके आणि भरत गणेशपुरे पाहायला मिळणार आहे. तसेच शोचे सूत्रसंचालन मराठी अभिनेता अभिजीत खांडकेकर करणार आहे. चाहते कॉमेडीच्या मेजवानीची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.