भारत आणि इंग्लंडमधील दुसऱ्या कसोटी सामन्याचा आज अखेरचा दिवस आहे. इंग्लंडला एजबेस्टन कसोटी सामना जिंकण्यासाठी अखेरच्या दिवशी 536 धावांची गरज आहे. भारताने गोऱ्या साहेबांसमोर 608 धावांचे उद्दिष्ट ठेवले आहे. चौथ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारताने इंग्लंडचे 3 खेळाडू 72 धावांवर तंबूत पाठवले होते. पण उलटफेर करण्याता हा संघ माहिर मानण्यात येतो. हा संघ धावांचा डोंगर उभा करू शकतो का? असा सवाल विचारण्यात येत आहे. इंग्लंड 536 धावा चोपू शकतो का? टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात एका दिवसात सर्वाधिक धावा कधी आणि कोणत्या संघाने केल्या होत्या? अखेरच्या दिवशी 500 पेक्षा अधिक धाव करणे शक्य आहे का? या सवालांचे उत्तर जाणून घेऊयात…
कसोटीत एका दिवसात 588 धावा
कसोटी इतिहासात एका दिवसात धावांचा डोंगर रचण्याचा इतिहास झाला आहे. एका दिवसात 588 धावा चोपण्यात आल्या आहेत. हा कारनामा इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी सामन्या दरम्यान 1936 साली हा विक्रम करण्यात आला होता. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात पाच वेळा असे यापूर्वी घडले होते. त्यावेळी 500 हून अधिक धावा करण्यात आल्या. पण धावांचा डोंगर हा 5 व्या अथवा अखेरच्या दिवशी हा विक्रम झालेला नाही. तो विक्रम आज इंग्लंड करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कसोटीच्या पाचव्या दिवशी सर्वाधिक धावा
कसोटीच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम झाला आहे. 2001 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड या दोन देशात कसोटी सामना झाला. त्यात 459 धावा करण्यात आल्या होत्या. पण आतापर्यंत 500 अथवा त्याहून अधिक धावा अखेरच्या दिवशी कसोटी इतिहासात आतापर्यंत झाल्या नाहीत. त्यामुळे भारताविरोधात इंग्लंडला ऐतिहासिक विजय मिळवायचा असेल तर त्याला धावांचा डोंगर उभारावा लागणार आहे.
धावांचा पाठलाग करण्यात यश
टेस्ट क्रिकेट इतिहासात आतापर्यंत 418 धावांपेक्षा अधिकचे लक्ष्य कोणत्याही संघाला गाठता आलेले नाही. हा कारनामा वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाविरोधात 2003 मध्ये करून दाखवला होता. या सामन्यात वेस्ट इंडिजने 3 धावांसह विजय नोंदवला होता. टेस्ट क्रिकेटमध्ये 4 वेळा 400 पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करण्यात आला आहे. त्यात इंग्लंड संघाचे नाव नाही. पण टीम इंडियाचे नाव आहे.