विलिनीकरणाबाबत ऊर्जा कंपनीची मोठी घोषणा! आता हे शेअर असतील फोकसमध्ये, किंमत फक्त 65 रुपये
Suzlon Energy Stocks Price : रिन्यूएबल एनर्जी कंपनी सुझलॉन एनर्जीचे शेअर येत्या आठवड्यात चर्चेत राहू शकतात. कारण कंपनीने गेल्या शुक्रवारी घोषणा केली की, त्यांच्या प्रस्तावित कॉर्पोरेट पुनर्रचना योजनेसाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बीएसई (BSE) या दोन्हीकडून 'कोणताही आक्षेप नाही' असे पत्र मिळाले आहे. या मंजुरीमुळे त्यांची पूर्ण मालकीची उपकंपनी सुझलॉन ग्लोबल सर्विसेस लिमिटेडचे मूळ कंपनीत विलीनीकरण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कंपनीने 5 जुलै रोजी एक्सचेंज फाइलिंगमध्ये याची माहिती दिली की हे पत्र गुरुवारी, 3 जुलै रोजी प्राप्त झाले होते. पुनर्रचना एका व्यवस्था योजनेखाली अंतर्गत असून ज्यात सुझलॉन तिचे भागधारक आणि कर्जदार यांचा समावेश आहे. एनएसईवर सुझलॉनचे शेअर 0.58% किंवा मागील बंद भावाच्या तुलनेत 0.38 रुपये वाढून 65.65 रुपयांवर बंद झाले.
काय आहे तपशील?या योजनेअंतर्गत सुझलॉनने आपले राखीव निधी (रिझर्व्ह) कमी करण्याची आणि पुनर्रचना करण्याची योजना आखली आहे, ज्यासाठी ते सामान्य राखीवमधून क्रेडिट शिल्लक रिटेन्ड अर्निंग्समध्ये हस्तांतरित करतील. या निर्णयाचा उद्देश मागील वर्षांमध्ये झालेल्या संचित तोट्याची भरपाई करणे आहे. कंपनीने म्हटले, "या पुनर्रचनेमुळे स्वच्छ ताळेबंद तयार होण्यास मदत होईल, ज्यामुळे लाभांश देण्याची आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याची आमची क्षमता सुधारेल अशी अपेक्षा आहे."
मार्च तिमाहीचे निकालजानेवारी-मार्च 2025 तिमाहीसाठी, कंपनीने त्यांच्या निव्वळ नफ्यात 365 टक्के मोठी वाढ नोंदवली आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीतील 254 कोटी रुपयांच्या तुलनेत 1,181 कोटी रुपये राहिला. या कालावधीसाठी सुझलॉनचा निव्वळ महसूल 3,774 कोटी रुपये राहिला.
शेअर्सची बाजारातील कामगिरीSuzlon Energy च्या शेअर्सने गेल्या महिनाभरात सपाट कामगिरी केली आहे. गेल्या सहा महिन्यात शेअरने 11 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. तर गेल्या वर्षभरात शेअरने 20 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. यासोबतच गेल्या 5 वर्षाचा विचार करता शेअरने 1250 टक्के इतका मल्टीबॅगर परतावा दिला आहे.