आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा देखील उपस्थित आहेत.
Ashadhi Ekadashi LIVE News : मुख्यमंत्री महापूजेसाठी विठ्ठल मंदिरात दाखल, थोड्याच वेळात महापूजेला होणार सुरुवातमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात महापूजेसाठी सहकुटुंब दाखल झाले आहेत. त्यासोबत लाखो भाविक देखील आज पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल झालेत. थोड्याच वेळात महापूजेला सुरुवात होणार आहे.
पंढरपूर : आषाढी एकादशीच्या मंगलमय दिवशी संपूर्ण पंढरपूर नगरी भक्तिभावाने न्हालेली असताना, 'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात पांडुरंगाच्या नगरीत अनोखे दृश्य पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी पारंपरिक फुगडीचा फेर धरून उपस्थित भाविकांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं.
Ashadhi Ekadashi : 'स्वच्छ वारी, सुंदर वारी, हरित वारी, आरोग्यदायी वारी...'; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरणमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूर येथे 'निर्मल दिंडी समारोप' कार्यक्रमादरम्यान, 'स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अभियान 2025'च्या बोधचिन्हाचे अनावरण केले.
CM Devendra Fadnavis News : राज्य शासनाकडून वारकरी सेवेचे नवे 'बेंचमार्क' प्रस्थापित!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पंढरपूर येथे ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाद्वारे आयोजित 'निर्मल दिंडी' उपक्रमाचा समारोप करण्यात आला.
CM Devendra Fadnavis : नाशिकच्या कैलास दामू उगलेंना मुख्यमंत्र्यांसोबत महापूजा करण्याचा माननाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील कैलास दामू उगले यांना वारकरी प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आषाढी एकादशीची विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्याचा मान मिळाला आहे. कैलास उगले हे शेतकरी असून ते गेल्या 12 वर्षांपासून पंढरीची नियमित वारी करत आहेत.
Ashadhi Ekadashi : एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार; महापूजा सोहळा पहाटे 2.30 वाजता होणार सुरुएकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मानाचे वारकरी आणि 10 मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांसह मुख्यमंत्री महापूजा करणार आहेत. हा सोहळा पहाटे 2.30 वाजता सुरु होणार आहे.
Ashadhi Ekadashi Pandharpur : पंढरपूर नगरी भक्तिभावाच्या रंगांत सजली; आज आषाढी एकादशीचा पवित्र उत्सवAshadhi Ekadashi Pandharpur 2025 LIVE News : हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा दिवस म्हणजे देवशयनी आषाढी एकादशी. दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला हा सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. या दिवशी श्री विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन भक्तगण उपवास, नामस्मरण आणि पूजाअर्चा करतात.
आषाढी एकादशी ही केवळ धार्मिक परंपरा नसून, ती भक्तीचा महासागर आहे. हजारो वारकरी विठुरायाच्या ओढीने पंढरपूरकडे वारी करतात. "विठ्ठल! विठ्ठल!"च्या गजरात संपूर्ण वातावरण भक्तिमय होतं. पंढरपूरचा विठोबा आणि रुक्मिणीमातेचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये एकत्र येतात. या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेत जातात, म्हणून ही एकादशी देवशयनी म्हणून ओळखली जाते. पुढील चार महिन्यांच्या चातुर्मासात धार्मिक उपासना, व्रतं आणि संयमाचे पालन केले जाते. देवशयनी एकादशी ही केवळ एक धार्मिक तिथी नसून, श्रद्धा, शिस्त आणि भक्तीचे प्रतीक आहे, जी भक्तांच्या हृदयात अध्यात्मिक आनंदाची दीपज्योत प्रज्वलित करते.
संपूर्ण पंढरपूर नगरी सध्या भक्तिभावाच्या रंगांनी सजली आहे. आषाढी एकादशीचा पवित्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून, शहरातील प्रत्येक गल्लीत "विठ्ठल! विठ्ठल!"चा गजर घुमतो आहे. संतांच्या पवित्र पालख्या इंद्रायणीच्या पावन तीरावर विसावल्या असून, वारकऱ्यांच्या ओसंडून वाहणाऱ्या श्रद्धेमुळे पंढरपूर नगरी विठ्ठलमय झाली आहे. विठुरायाच्या महापूजेपासून ते वारीतील प्रत्येक क्षणांपर्यंत संपूर्ण वातावरण भक्तिरसाने ओथंबलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविक विठोबाच्या चरणी नतमस्तक होत वारीमध्ये सहभागी झाले आहेत. या वारीचे सर्व अपडेट्स आणि आषाढी एकादशीचा सोहळा पाहा एका क्लिकवर...