(फोटो छान आहे.)
75672
चिमुकल्यांच्या कलेपुढे सारेच नतमस्तक
कळसुलकर शाळेत वारकरी दिंडी उत्साहात
सावंतवाडी, ता. ६ ः सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा अर्थात कळसुलकर प्राथमिक शाळेतील मुलांनी कळसुलकर शाळा ते सावंतवाडीतील प्रसिद्ध संस्थानकालीन विठ्ठल मंदिरापर्यंत वारकरी दिंडी वाजतगाजत काढली. यावेळी शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
वारकरी दिंडी पाहण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने नागरिकांनी गर्दी केली होती. मुलांनी विठ्ठल रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली, संत सावतामाळी, जनाबाई, मुक्ताबाई अशा विविध संतांच्या वेशभूषा साकारल्या. मंदिर प्रशासनाकडून मुलांचे स्वागत केले व खाऊचे वाटप केले. पहिली ते चौथीपर्यंतची १६० मुले वारीमध्ये सहभागी झाली. पांडुरंगाचा जयघोष करत बाजारपेठेतून विठ्ठल मंदिरात सर्वांनी विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले. विठ्ठलाचे अभंग, प्रार्थना तसेच रिंगण करून विविध कार्यक्रम सादर केले. मुख्याध्यापक प्रदीप सावंत, शिक्षक डी. जी. वरक, अमित कांबळे, जोत्स्ना गुंजाळ, प्राची बिले, स्वरा राऊळ, संजना आडेलकर, स्मिता घाडीगावकर, श्रीमती पायशेट आदी उपस्थित होते.