माजी सरन्यायाधीश धनंजय वाय. चंद्रचूड यांनी लुटियन्स दिल्लीतील कृष्ण मेनन मार्गावरील सरकारी बंगला क्रमांक 5 रिकामा न करण्यामागील कारणे स्पष्ट केली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाने केंद्र सरकारला पत्र लिहून हा बंगला तात्काळ रिकामा करण्याची मागणी केल्यानंतर चंद्रचूड यांनी स्वतः याबाबत उत्तर दिले आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीला गंभीर अनुवांशिक आजार असल्याने योग्य घर शोधण्यात विलंब होत आहे.
मुलीला गंभीर आजार -चंद्रचूड यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, त्यांच्या मुलीला नेमालाइन मायोपैथी नावाचा गंभीर अनुवांशिक आजार आहे, ज्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात तज्ज्ञांकडून उपचार सुरू आहेत. “माझ्या कुटुंबाला योग्य निवास शोधण्यासाठी वेळ लागत आहे. हा वैयक्तिक मुद्दा आहे, परंतु मी माझ्या जबाबदाऱ्या पूर्णपणे समजतो,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढे सांगितले की, याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आणि अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून, ते लवकरच बंगला रिकामा करतील.
VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ बंगला सध्याच्या सरन्यायाधीशांसाठी राखीवसर्वोच्च न्यायालयाने 1 जुलै 2025 रोजी आवास आणि शहरी व्यवहार मंत्रालयाला (MoHUA) पत्र लिहून बंगला क्रमांक 5 तात्काळ रिकामा करण्याची मागणी केली. हा बंगला सध्याच्या सरन्यायाधीशांसाठी राखीव आहे. चंद्रचूड यांनी आठ महिन्यांपूर्वीच आपले पद सोडले असले, तरी ते अद्याप टाइप VIII बंगल्यात राहत आहेत. त्यांचे दोन उत्तराधिकारी, न्या. संजीव खन्ना आणि सध्याचे सरन्यायाधीश भूषण आर. गवई, यांना आधीच वाटप केलेल्या बंगल्यात राहायचे आहे.
मुदतवाढचंद्रचूड यांनी 18 डिसेंबर 2024 रोजी तत्कालीन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांना पत्र लिहून बंगल्यात 30 एप्रिल 2025 पर्यंत राहण्यासाठी मुदतवाढ मागितली होती. त्यांनी तुगलक रोडवरील नवीन वाटप केलेल्या बंगला क्रमांक 14 मध्ये GRAP-IV अंतर्गत प्रदूषणाशी संबंधित निर्बंधांमुळे नूतनीकरणाचे काम थांबल्याचे कारण दिले.
लवकरच बंगला रिकामा करेन-चंद्रचूड यांनी आपल्या पत्रात नमूद केले की, यापूर्वीही माजी सरन्यायाधीशांना निवृत्तीनंतर सरकारी बंगला काही काळ ठेवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. “मी माझ्या जबाबदाऱ्यांबाबत पूर्णपणे जागरूक आहे आणि लवकरच बंगला रिकामा करेन,” असे आश्वासन त्यांनी दिले.
Viral Video: मृत्यूच्या दारातून परत आला... रामकुंडात अडकला तरूण, गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ! थरारक व्हिडिओ व्हायरल