Raigad Politics : रायगडाच्या वादाचा दुसरा अंक; शिवसेना भाजपामध्ये सुप्त संघर्ष
Saam TV July 07, 2025 06:45 AM

निवडणुकीचा निकाल लागून बराच काळ उलटूनही अद्याप रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री ठरलेला नाही. रायगड जिल्ह्यात शिवसेना राष्ट्रवादी वाद नवा नाही. अशातच आता रायगडमध्ये राष्ट्रवादी विरोधात भाजप नेत्यांनी देखील तोंड उघडले आहे. रोह्यातील डायलिसिस सेंटरच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरून हा नवा वाद निर्माण झाला आहे. या पत्रिकेत खासदार धैर्यशील पाटील यांचं नाव नसल्याने या नव्या वादाने डोकं वर काढलं आहे.

रायगड जिल्ह्यातील रोह्यात डायलिसिस सेंटरचे लोकार्पण होणार असून या लोकार्पणाच्या निमंत्रण पत्रिकेत केवळ मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांची नाव छापण्यात आल्याने भाजप खासदार धैर्यशिल पाटील यांनी अक्षेप घेतला आहे.

Raigad News: नदी किनारी दुर्गंधी पसरली, ग्रामस्थांनी सुटकेस उघडला, महिलेचा कोंबलेला मृतदेह पाहून..

समाज माध्यमांवर पोस्ट करत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. रायगड मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी वाद नवा नसला तरी भाजपच्या नेत्यांनी वादात उडी घेतल्याने नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Raigad News : घराच्या बाजूची अळंबी खाल्ली, एकाच कुटुंबातील पाच जणांना विषबाधा; रायगडमध्ये खळबळ भाजप खासदार धैर्यशिल पाटील काय म्हणाले ?

डायलिसिस सेंटरच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेतवरून भाजप खासदार धैर्यशिल पाटील यांचे नाव वगळण्यात आले. त्यानंतर धैर्यशिल पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. ते म्हणाले की , गेली अनेक वर्षे केवळ आपण, आणि आपणच असा प्रघात आहे, जो रोहा तालुक्यात सुरू आहे.

त्यात कुठं तरी बदल व्हायला हवा अशी अपेक्षा खासदार धैर्यशील पाटील यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करत केली. पाटील यांची नाराजी या पोस्टमधून दिसत होती.पाटील यांच्या नाराजीनंतर लागलीच नवीन पत्रिका काढण्यात आली. दरम्यान रायगडचा पालकमंत्री कधी ठरणार याचे उत्तर अजूनही अनुत्तरीतच आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.