पावसाळा सुरू झाला की प्रत्येकाला छान गरमागरम पदार्थ खायची इच्छा होतेच.
पण अशा काही भाज्या आहेत, ज्या पावसाळ्यात खाणं टाळायला हवं. त्यामुळे कारणंही आहेत.
पावसाळ्यात टोमॅटो लगेच खराब होतात. त्यामुळे अन्न विषबाधेची शक्यता वाढते.
फुलकोबीमध्ये पावसाळ्यात बुरशी किंवा कीटकांची अळी बऱ्याचदा आढळते. त्यामुळे पावसाळ्यात फुलकोबी खाणे शक्यतो टाळावे.
गाजर जमीनीच्या खाली येत असल्याने पावसाळ्यात अधिक ओलाव्यामुळे विषाणूंचे प्रमाण वाढू शकते.
शिमला मिर्ची पावसाळ्यात लवकर खराब होतात. त्यामुळे अन्न विषबाधेची शक्यता असते.
हिरव्या पालेभाज्यांमध्ये पावसाळ्यात जास्त ओलावा निर्माण होतो. या हवामानात बुरशी, जंतू व सूक्ष्मजीवांच्या वाढीस पोषक ठरते. त्यामुळे या भाज्यांमध्ये दूषितपणा होण्याची शक्यता वाढते.
वांग्याच्या झाडांना पावसाळ्यात बुरशीजन्य आजार होण्याची शक्यता जास्त असते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.