हिंदू धर्मात प्रत्येक तिथी, दिवस व महिन्याचं खास महत्त्व आहे. जीवनात सुख,शांती आणि समृद्धी लाभावी यासाठी प्रत्येकजण देवदेवतांची आराधना करतात. अशातच लवकरच चातुर्मास सुरू होणार आहे. चातुर्मासात भगवान विष्णूंची पूजा केली जाते. सनातन धर्मात चातुर्मासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच चातुर्मास हा उपासनेसाठी महत्त्वाचा मानला जातो. तर या दिवसांमध्ये केवळ भगवान विष्णुंचीच नाहीतर महादेवाची ही उपासना आराधना केली जाते. कारण चातुर्मास संपूर्ण पृथ्वीचे संरक्षण करणाऱ्या महादेवाची पूजा केल्यास माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
चार्तुमासादरम्यान भगवान विष्णुंसोबतच भगवान शंकरांची पूजाही करावी. रोज सकाळी लवकर उठून स्नान करावं. त्यानंतर मंदिरात जाऊन शंकरांची उपासना करावी. यावेळी त्यांना गंगाजल अर्पण करावं. खरं तर कोणत्याही प्रकारची उपासना, पूजा आणि भजनासाठी ठराविक वेळेची वाट पाहू नये. परंतु, चार्तुमासात अशी शुभ कार्य अवश्य करावी. यामुळे देवता प्रसन्न होतात. देवतांच्या कृपेमुळे आपलं जीवन सुखी होतं
भगवान महादेव यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची मनोभावे उपासना करा. असे मानले जाते की त्यांच्या भक्तांच्या उपासनेमुळे ते सहज प्रसन्न होतात. अशावेळेस महादेव यांना काय आवडते, त्यांच्या आवडत्या गोष्टी कोणत्या आहेत, कोणत्या अर्पण करून तुम्हाला इच्छित वरदान मिळू शकते हे जाणून घेणे महत्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊया.
या 10 वस्तू अर्पण करून शिवाला प्रसन्न करापाणी – शिवलिंगावर पाणी अर्पण केल्याने आपला स्वभाव शांत होतो. आपले वर्तन प्रेमळ बनते.
दूध – शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने आपल्याला चांगल्या आरोग्याचे आशीर्वाद मिळतात.
दही – भगवान महादेवांना दह्याने स्नान केल्याने स्वभावात गांभीर्य येते.
साखर – साखर अर्पण केल्याने घरात आनंद आणि समृद्धी वाढते.
मध – देवाला मध अर्पण केल्याने आपल्या बोलण्यात गोडवा येतो.
तूप – शिवलिंगावर तूप अर्पण केल्याने शक्ती वाढते.
सुगंधीत अत्तर – महादेवांना सुगंधीत अत्तर अर्पण केल्याने विचार शुद्ध होतात.
चंदन – शिवलिंगाला चंदन लावल्याने मान आणि प्रतिष्ठा वाढते.
भांग – महादेव यांना भांग खूप आवडते…. भांग अर्पण केल्याने सर्व वाईट आणि दुर्गुणांचा अंत होतो.
केशर – भगवान महादेवांना केशर अर्पण केल्याने सौम्यता येते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)