पावसाळ्यातली सांधेदुखी, घरगुती उपाय
Marathi July 08, 2025 11:25 AM

पावसाळा सुरू झाला की अनेकांना संधीवाताचा म्हणजेच सांधेदुखीचा त्रास सुरू होतो. ज्याचा थेट परिणाम आरोग्यावर होत असल्याने अनेकांसाठी पावसाळा त्रासदायक ठरतो. पण योग्य काळजी घेतल्यास पावसाळ्यातल्या सांधेदुखीच्या त्रासापासून बचाव करणे सहज शक्य आहे. त्यासाठी काय करावे ते बघुया.

पावसाळ्यात हवेत आद्रता वाढते त्यामुळे वातावरण दमट व कोंदट असते. असे वातावरण विषाणूंच्या वाढीसाठी योग्य असल्याने या दिवसात अनेक आजार डोके वर काढतात. तसेच पावसाळ्यात ऊन पावसाचाही लंपडाव सुरू असतो. यामुळे कधी वातावरण थंड तर कधी गरम असे हवामान असते. परिणामी वातावरणातील या बदलांचा परिणाम शरीरावरही होत असतो. या दिवसात हवेचा दाब कमी होतो. या बदलांमुळे सांध्यामधील द्रव पदार्थाचा समतोल बिघडतो. परिणामी सांध्याना सूज येते. यामुळे संधीवाताच्या रुग्णांना या दिवसात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकांना बसणे, उठणेही शक्य होत नाही.

व्यायाम

पावसाळ्यात पावसाळामुळे जिमला जाणे, वॉकिंग करणे किंवा धावणे यासाऱखे व्यायाम करता येत नाहीत. त्यामुळे शरीराची हालचाल कमी होते. त्यामुळे स्नायू कमकुवत होतात. कडक होतात. त्यामुळे सांधे दुखू लागतात. यामुळे व्यायाम करणे बंद करू नये. जमेल तसा घरात व्यायाम करावा. स्ट्रेचिंग,वॉकिंग , जॉगिंग घऱातच करावेत.

हायड्रेटेड

पावसाळ्यात तहान लागत नाही. त्यामुळे पाणी कमी प्रमाणात पिले जाते. पण प्रत्येक व्यक्तीने दररोज ८ ते १० ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. कारण पाणी पिल्याने सांधे लवचिक राहतात. त्यामुळे त्यांची हालचाल सहज करता येते.

सोडियम

पावसाळ्यात जर तुम्हालाही सांधेदुखीचा त्रास होत असेल तर सांध्याची सूज कमी करण्यासाठी आहारातून सोडियमचे प्रमाण कमी करावे.

आहार

सांधेदुखीच्या त्रासापासून मुक्तता हवी असेल तर आहारात चिया सीड्स, ब्रोकली, जव यांचे सेवन करावे. तसेच हळददेखील सांधेदुखीवर गुणकारी असल्याने जेवणात हळदीचा वापर करावा. हळदीमधील करक्यूमिन हे सांध्यामधील सूज, वेदना कमी करते.

 

 

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.