माणसाला झोप ही खूप महत्वाची असते. आपण जसं आपल्या आहाराकडे लक्ष देतो तसंच झोपेसाठी पण काही नियम लावून घेतले तर झोप चांगली यायला मदत होते. ज्याला स्लिप हायजिन (Sleep Hygiene) असं ही म्हटलं जातं. झोपेच्या सवयींवर काम करणं प्रत्येकासाठी विशेषतः लहान मुलं आणि प्रौढ वर्गासाठी ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. आणि किशोरवयीन मुलांना झोप न येणं सामान्य आहे. म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून उशिरापर्यंत जागे राहणे आरोग्यावर परिणाम करू शकतं. त्यासाठी काही गोष्टी लक्षात घेऊन त्यांचं पालन केलं पाहिजे म्हणजे मुलांना लवकर झोप यायला मदत होईल आणि मिळालेल्या चांगल्या झोपेमुळे आरोग्यपण उत्तम राहील. (Detailed Bedtime Tips for Children)
मुलांना झोप आणण्यासाठी 9 स्लिप हायजिन टिप्स:
1) झिपण्यापूर्वीची क्रिया ठरवा: मुलांना तणावमुक्त आणि शांत वाटण्यास मदत करणारी कोणीतही गोष्ट करू शकता. जसं, झोपण्यापूर्वी गरम पाण्याने अंघोळ, शांत माईंड फ्रेश संगीत ऐकणे, कॅमोमाइल चहा पिणे, श्वासावर लक्ष केंद्रित करणे किंवा स्ट्रेचिंग करणे यांसारख्या ऍक्टिव्हिट्सचा समावेश करू शकता.
2) रात्री ब्राईट लाईट आणि स्क्रीनचा वापर कमी करा: संध्याकाळच्या वेळी कमी प्रकाश असलेले दिवे लावण्याचा प्रयत्न करा. मोबाईल, टीव्ही यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाचा प्रखर प्रकाश मुलांच्या डोळ्यांना त्रास देऊ शकतो त्यामुळे तो मर्यादित ठेवा. आणि झोपण्यापूर्वी 1 तास आधी कोणतीही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं न वापरण्याची सवय मुलांना लावा.
3) झोपेची वेळ ठरवा: दररोज एकाच ठराविक वेळी झोपणं आणि उठणं सर्केडियनसाठी उपयुक्त ठरतं आणि शरीराचे अंतर्गत घड्याळ नव्याने रिसेट करण्यास मदत करतं.
4) खोलीचे तापमान झोपण्यास साजेसे ठेवा: मुलं झोपत असलेली खोली थंड ठेवा. आवाज आणि प्रकाश टाळा आणि जर टाळता येत नसेल तर स्लिप मास्क आणि इअरप्लग वापरायला द्या.
5) पुरेशी झोप घेणे महत्वाचे: शालेय वयीन मुलांना सुमारे 9-12 तास झोप घेणे आवश्यक असते. आणि जर मुलं यापेक्षा अधिक कमी झोप घेत असतील तर ते अस्वस्थ होण्याची शक्यता असते झोप पूर्ण न झाल्याने शरीर लवकर थकते.
6) सकाळी उठल्यावर सूर्यप्रकाश द्या: सकाळी उठून काही वेळ सूर्यप्रकाशात उभं राहा किंवा गॅलरी मध्ये उभे केले तरी उत्तम याने मेंदूला जागरूकता मिळते की दिवसाची सुरुवात झाली आहे आणि झोप कमी थांबायला सुरुवात होते.
7) कॅफिन टाळा: लहान मुलांना कॅफिनयुक्त पदार्थ देऊ नका. तर प्रौढांनी दुपारी 3 नंतर कॅफिन टाळणं उपयुक्त ठरू शकतं.
8) झोप मर्यादित ठेवा: मुलांना झोप येत नसेल तर जबरदस्ती झोपवू नका. दुपारी जबरदस्ती झोपायला लावल्यास रात्री उशिरा झोप येण्याची शक्यता जास्त आहेन आणि त्यामुळे मुलं उशिरापर्यंत जागी राहू शकतात.
9) व्यायाम: नियमित व्यायामाची सवय लावली तर चांगली झोप लागते.
हेही वाचा: