तारापूर (बातमीदार) : डहाणू वनविभागअंतर्गत बोईसर वनपरिक्षेत्र विभागात यावर्षी सात हजार ७७७ झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानुसार शिगाव ग्रामपंचायत हद्दीतील खुताड आश्रमशाळेजवळील वनविभागाच्या जागेत वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला. पालघरचे पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, डहाणू वनविभागाचे उपवनसंरक्षक निरंजन दिवाकर, एस. मधुमिता, कांदळवन विभागाचे रामानुज बागड, उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक, पोलिस निरीक्षक शिरीष पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी अपेक्षा साटम, वनक्षेत्रपाल कैलास कडू, सरपंच दीप्ती सुमडा, स्थानिक रहिवासी, वनविभागाचे कर्मचारी आणि आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते ३०० मिश्र वन झाडांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला.