‘या’ लोकांनी सकाळी रिकाम्या पोटी काकडी खाणे टाळा, अन्यथा…
GH News July 08, 2025 06:08 PM

प्रत्येकाला निरोगी जीवन जगायचे असते, यासाठी आपण जीवनशैलीत बद्दल करत असतो. त्याचाबरोबर आहारात आणि डाएटमध्ये देखील बदल करत असतो. कारण आपल्याला निरोगी जीवनसाठी जसा व्यायम गरजेचा असतो तसाच आहार देखील फार महत्वाचा असतो, अशातच तुम्ही जर आहार योग्य पद्धतीने घेतल्यास आजारी पडत नाही. पण मात्र आहार घेताना केलेली छोटीशी चुक देखील आपल्याला खूप महागात पडु शकते. याकरिता जर आरोग्याच्या काही समस्या सतावत असेल तर काही पदार्थ खाणे टाळे पाहिजे. तुम्हाला जर आरोग्याच्या या समस्या सतावत असतील तर रिकाम्या पोटी काकडीचे सेवन कधीही करू नका अन्यथा आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. चला तर मग आजच्या या लेखात आपण जाणून घेऊयात की कोणत्या लोकांनी काकडीचे सेवन करणे टाळावे.

कोणी खाऊ नये काकडी ?

काकडी शरीराला थंड ठेवण्यासाठी ते हायड्रेट ठेवण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी फायदेशीर आहे. अशातच काकडीमध्ये व्हिटॅमिन सी देखील असते जे आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरते. बहुतेक लोकं काकडीचे सेवन सॅलडमध्ये खातात. तर काहीजण वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी काकडीचे सेवन करत असतात. पण कधी-कधी काही लोकांना रिकाम्या पोटी काकडी खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू लागतात.

तर यावेळी आयुर्वेद तज्ञ किरण गुप्ता यांनी सांगितले की, रिकाम्या पोटी काकडी खाल्ल्याने अ‍ॅसिडिटी होऊ शकते. ते प्रत्येक व्यक्तीच्या पचनक्रियेवर अवलंबून असते. ज्या लोकांचे पोट स्वच्छ आहे आणि ज्यांना अ‍ॅसिडिटीची समस्या नाही, त्यांना रिकाम्या पोटी काकडी खाण्यास कोणतीही अडचण येत नाही. परंतु ज्या लोकांना अ‍ॅसिडिटीची समस्या जास्त सतावत असते किंवा शरीरात वात, पित्त आणि कफ संतुलित नाहीत, त्यांनी रिकाम्या पोटी काकडी खाऊ नये.

तुम्हाला जर आम्लपित्त असेल किंवा शरीरातील पित्त, कफ आणि वात दोष संतुलित नसतील, तर तुम्ही कधीच रिकाम्या पोटी काकडीचे सेवन करू नये. तर या परिस्थितीत त्यांनी सकाळी काही फळे, अंजीर, मनुका किंवा हलका नाश्ता केल्यानंतरच काकडी खावी. परंतु अशी फळे आणि पदार्थ खाऊ नका ज्यामुळे आम्लपित्त वाढेल.

काकडी सॅलडमध्ये खाण्याव्यतिरिक्त अनेक प्रकारे आहारात समाविष्ट करता येते. तुम्ही काकडी रायत्यात किंवा ताकात बारीक किसून टाकू शकतात. तसेच काकडीपासून तुम्ही स्मूदी, ज्यूस किंवा डिटॉक्स वॉटर बनवू शकता. जर तुम्हाला सँडविच खायला आवडत असेल तर तुम्ही त्यात काकडी समावेश करू शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.