rat७p१२.jpg-
२५N७५९४७
साखरपा : तिल्लोरी कुणबी समाज साखरपा पंचक्रोशीच्या विद्यार्थी गुणगौरव व समाजप्रबोधन कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मान्यवर.
--------
विद्यार्थी, पालकांमध्ये सुसंवाद गरजेचा
डॉ. सदानंद आग्रे ः साखरपा तिल्लोरी कुणबी विद्यार्थ्यांचा गुणगौरव
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. ८ : विद्यार्थी, पालकांमध्ये व कुटुंबामध्ये सुसंवाद महत्त्वाचा आहे. मुलांनी आई-वडिलांची स्वप्नं समजून घेतली पाहिजेत आणि संयम ठेवला पाहिजे. फक्त परीक्षेतील गुणांच्या मागे न लागता कठोर परिश्रम घेतले तर कोणतेही क्षेत्र अवघड नाही; मात्र विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीने परिश्रम घेतले तर यश दूर नाही, असे प्रतिपादन तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ. सदानंद आग्रे यांनी केले.
साखरपा पंचक्रोशीतील तिल्लोरी कुणबी समाजाचा विद्यार्थी गुणगौरव व समाज प्रबोधन सोहळा रविवार (ता. ६) लाड सभागृहात झाला. त्या वेळी ते बोलत होते. १५० विद्यार्थ्यांना उपयुक्त साहित्य आणि प्रशस्तिपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. संस्थाध्यक्ष सीताराम जोशी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाला उद्योजक विष्णूशेठ रामाणे, श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. संदीप ढवळ, प्राचार्य विजय बाईंग, शंकरशेठ नवाळे, अमोल लाड, हरिभाऊ धुमक, कुणबी पतसंस्था लांजा, शाखा देवरूखचे शाखाधिकारी गंगाराम कालकर उपस्थित होते.
---
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निरसन
कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांनी शिक्षण आणि करिअर विषयी मनातील प्रश्नांवर डॉ. आंग्रे यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या प्रश्नांचे निरसन करून आत्मविश्वासाने प्रयत्न करा यश नक्की मिळेल असा आत्मविश्वास त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण केला.