पतंजलीने आज जागतिक आयुर्वेदाच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. पतंजलीने ऐतिहासिक पाऊल उचलत जगातील सर्वात मोठ्या आयुर्वेदिक टेलिमेडिसिन प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले आहे. या आयुर्वेदिक टेलिमेडिसिन सेंटरचे औपचारिक उद्घाटन स्वामी रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या हस्ते यज्ञ आणि वैदिक मंत्राच्या जयघोषात केले आहे.
या प्रसंगी स्वामी रामदेव यांनी हे टेलिमेडिसिन सेंटर हरिद्वार ते हर द्वारपर्यंत पोहचणार असल्याचे म्हटले आहे. हे टेलीमेडिसिन केंद्र भारताच्या ऋषीमुनींपासून चालत आलेल्या परंपरेचे ज्ञान प्रत्येक घरात पोहचवण्याचा एक दिव्य साधन बनणार आहे. या सर्व आरोग्याच्या सेवा ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत.ज्या लाभ कोट्यवधी लोकांना जगभर होणार आहे. पतंजलीचे टेलीमेडिसिन सेंटर मानव सेवेसाठी उत्कृष्ट पाऊल ठरणार आहे.
उद्घाटन समारंभात आचार्य बाळकृष्ण म्हणाले की ज्याप्रमाणे संपूर्ण जग योगासाठी भारताकडे पाहत आहे, त्याचप्रमाणे जग आता आयुर्वेद आणि त्याच्या उपचारासाठी आशेने भारताकडे पाहत आहे. हे टेलिमेडिसिन सेंटर त्या दिशेने एक उत्तम पाऊल ठरणार आहे. आचार्य बाळकृष्ण यावेळी म्हणाले की पतंजली टेलिमेडिसिन सेंटर हे एक पूर्णपणे विकसित आणि सर्वोत्तम मॉडेल ठरणार आहे.
* मोफत ऑनलाइन आयुर्वेदिक सल्लामसलत
* पतंजलीच्या उच्च प्रशिक्षित डॉक्टरांची टीम
* प्राचीन शास्त्रांमध्ये रुजलेली वैयक्तिकृत हर्बल प्रिस्क्रिप्शन
* डिजिटल आरोग्य नोंदी आणि पद्धतशीर फॉलो-अप
* व्हॉट्सअॅप, फोन आणि वेब-आधारित प्लॅटफॉर्मद्वारे सहज उपलब्धता
हा उपक्रम प्रत्येक घरात प्रामाणिक, शास्त्र-आधारित आयुर्वेदिक आरोग्य उपचाराचा आधार बनेल. विशेषतः दुर्गम भागात आणि परदेशात राहणाऱ्यांना याचा विशेष फायदा होईल, जे केंद्राला भेट देऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी हा उपक्रम वरदान ठरणार आहे.