‘विकसित महाराष्ट्र- २०४७’ सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी विधानसभेतील सर्व सदस्यांनी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नागरिकांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधिमंडळात निवेदनाद्वारे केले.
ते म्हणाले, ‘राज्य सरकारने १०० दिवसांच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर ६ मे ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १५० दिवसांचा कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली असून यात ‘विकसित महाराष्ट्र @२०४७’ साठी भविष्यदर्शी आराखडा तयार करण्याचा समावेश करण्यात आला आहे.’
अजित पवार म्हणाले...
सदस्यांनी समाजमाध्यमांद्वारे, मेळावे, बैठकांमध्ये ‘विकसित महाराष्ट्र - २०४७’ च्या नागरिक सर्वेक्षणात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करावे
सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य आस्थापनांच्या माध्यमातून नागरिकांना सर्वेक्षणात भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे
सरकारच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या क्यूआर कोड व लिंक वरून सर्वेक्षणात सहभागी होता येईल