उल्हासनगर - तीन वर्षे उल्हासनगर महानगरपालिकेतील विविध योजनांना, विकासकामांना दिशा देण्याचा प्रयत्न केल्यावर चार महिन्यांपूर्वी बदली झालेले अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या जागी चार महिन्याच्या प्रतीक्षेनंतर प्रतिनियुक्तीवर धीरज चव्हाण यांची अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
चव्हाण यांच्या आगमनाने पहिल्यांदाच महानगरपालिकेत प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची नवी टीम सक्रिय झाली आहे.
धीरज चव्हाण हे पदोन्नतीवर आले असून ते याआधी उपमुख्यमंत्री कार्यालयात विशेष कार्य अधिकारी होते. तसेच अंबरनाथ नगरपालिकेत उप मुख्याधिकारी देखील होते.
पूर्वी महानगरपालिकेत प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्र शासनाचे बोटावर मोजण्याइतपत अधिकारी असायचे. आता मात्र अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, धीरज चव्हाण, उपायुक्त विशाखा मोटघरे, अनंत जवादवार, दिपाली चौगले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश शिरसाठे, सहायक आयुक्त अजय साबळे, सुनील लोंढे, मयुरी कदम ही प्रतिनियुक्तीवरील नवी टीम आलेली आहे.