प्रियंकाचा पती निक जोनस याने केली बायकोची स्तुती, म्हणाला ती एक 'संत' आहे, तिने कधी चुकीचं…
Tv9 Marathi July 10, 2025 04:45 AM

बॉलीवूडची देशी गर्ल प्रियंका चोपडा हीने परदेशी गायक निक जोनस याच्याशी लग्न केल्यानंतर त्यांना एक मुलगीही झाली आहे. दोघेही जण मुलगी मालती मेरी हीला खेळवण्यात जीवनाचा आनंद घेत आहेत. अलिकडेच निक जोनस मुलगी मालती हीचा पिता होण्यासंदर्भात मोकळेपणाने बोलला आहे. प्रियंकाची स्तूती करताना तो म्हणाला की ती ‘अद्भूत टीम मेट’ आहे. तो यावेळी म्हणाला की मी मुलीला सांगेन की तिची आई प्रियंका एक ‘संत’ आहे. तिने कधी चुकीचं काम केले नाही आणि ती सर्वात चांगली आहे.

तुझी आई एक संत आहे

लुईस होवेस सह ‘द स्कूल ऑफ ग्रेटनेस’वर बोलताना निक जोनस याला विचारले की जर पृथ्वीवर तुझा शेवटचा दिवस असेल तर तू मुलगी मालती मेरी हीला कोणते तीन धडे देशील ? यावर निक म्हणाला की मी मुलीला म्हणणे तुला प्रेमळ असण्याचा कधी पश्चाताप होणार नाही, भले हे अशक्य वाटेल, दरवाजा नेहमी उघडा राहील, टेबल मोठे राहील हे पहा. तु जाणतेस आपल्या घरात प्रत्येकाचे स्वागत आहे. त्यांच्यासाठी राहणे आणि खाण्यासाठी जागा आहे. दरवाजा नेहमीच खुला असतो. तुझी आई एक संत आहे. तिने तिच्या आयुष्यात कधीच चुकीचे काम केलेले नाही. ती सर्वात चांगली आहे.’

तिच्या सारख्या प्रतिभाशाली व्यक्ती सोबत…

यावेळी निक याने प्रियंकाची स्तुती करताना म्हटले तिचे सहकार्य, मालती मेरीचा बाप बनणे, तिला आणखीन खास बनवते. निक पुढे म्हणाला की, माझ्या पत्नीच्या रुपात एक अद्भूत टीममेट होणे, ती ज्या पद्धतीची महीला आहे. तिने माझी आणि माझ्या मुलीची मदत केली आहे. आम्हा सर्वांना यामुळे लाभ झाला आहे. आणि तिच्या सारख्या प्रतिभाशाली व्यक्ती सोबत खांद्याला खांदा मिळवून चालणे अद्भूत आहे. हे पिता बनने आणखी खास बनवते.

 आमच्या मुली खूप चांगल्या मैत्रीणी

प्रियंका आणि निक त्यांच्या तीन वर्षांची मुलगी मालती मेरी चे खुप प्रेमळ आई-बाबा आहेत. प्रियंका नेहमी मालती सर्वात चांगले फोटो आणि व्हिडीओ शेअर करीत असते. अलिकडेच तिने सलमान खानची भाची आयत शर्मा हिच्याशी मालती खेळतानाचा एक सुंदर फोटो शेअर केला होता. प्रियंकाने सलमानची बहिण अर्पिता खान-शर्मा हीच्याशी अमेरिकेत सरप्राईज भेट झाल्यानंतर आनंद व्यक्त केला आणि आमच्या मुली खूप चांगल्या मैत्रीणी असल्याचे म्हटले होते.

डिसेंबर २०१८ मध्ये लग्न

बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा आणि निक जोनस यांनी काळी काळ एकत्र राहील्यानंतर डिसेंबर २०१८ मध्ये लग्न केले. जानेवारी २०२२ मध्ये प्रियंकाने सरोगेट मदरद्वारे मुलगी मालती मेरी चोपडा हिला जन्म दिला. प्रियंकाने अलिकडेच अमेझॉन प्राईम व्हिडीओवरील इल्या नाईशुलरच्या हेड्स ऑफ स्टेटमध्ये काम केले होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.