ज्योतिषशास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र किंवा राहू कमकुवत असेल तर त्याच्यावर वाईट नजरेचा खूप लवकर परिणाम होतो. बऱ्याच वेळा लोकांच्या आयुष्यात अचानक समस्या वाढतात किंवा विचित्र घटना घडू लागतात, जे वाईट नजरेचे,दृष्ट लागल्याचे लक्षण असू शकते. आपल्याला कोणाची दृष्ट लागली आहे की नाही, हे कसं ओळखावं, हे बऱ्याच लोकांना जाणून घ्यायचं असतं. ज्योतिषशास्त्र अशा काही लक्षणांबद्दल सांगते जे एखाद्या व्यक्तीवर वाईट नजरेखाली असताना जाणवतात. चला जाणून घेऊया वाईट नजरेची लक्षणे कोणती आहेत.
नजर लागणं म्हणजे काय ?
नजर दोषाला सामान्यतः वाईट नजर किंवा दृष्ट लागणं असं म्हणतात. धार्मिक श्रद्धेनुसार, एखाद्या व्यक्तीवर किंवा वस्तूवर जेव्हा एखाद्याची नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट नजर पडते तेव्हा त्यावर नकारात्मक परिणाम होतो. नजर दोष हा शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक समस्या निर्माण करू शकतो.
हात आणि पायांची नखं खराब होणं
ज्योतिषशास्त्रानुसार, जर तुमच्या हाताची आणि पायाची नखं अचानक खराब होऊ लागली किंवा तुटू लागली तर समजून घ्या की तुम्ही वाईट प्रभावाखाली आहात. हे एखाद्याच्या नकारात्मक उर्जेचा परिणाम असू शकतो.
कावळ्याने हाड फेकणं
धार्मिक मान्यतेनुसार, जर कावळा तुमच्या घरी येऊन हाड फेकत असेल तर ते खूप वाईट लक्षण आहे. याचा अर्थ असा की तुमच्यावर वाईट नजर पडली आहे. जर असे घडले तर तुम्ही वाईट नजर काढून टाकण्यासाठी उपाय केले पाहिजेत.
बेचैन वाटणं आणि तणाव
असे मानले जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाईट नजरेचा त्रास होतो तेव्हा ती व्यक्ती रात्री झोपू शकत नाही, ती व्यक्ती तणावात राहतो आणि कोणत्याही कारणाशिवाय डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाईट नजरेचा त्रास होतो तेव्हा ती व्यक्ती दररोज कोणत्या ना कोणत्या समस्येने वेढलेली असते .
रात्री वाईट स्वप्न पडणं
ज्योतिषशास्त्रानुसार, रात्री वाईट स्वप्ने पडणे हे देखील सूचित करते की एखाद्याच्या नकारात्मक उर्जेने तुम्हाला वेढले आहे किंवा तुमच्यावर वाईट नजरेचा परिणाम झाला आहे. रात्री झोपताना अचानक डोळे उघडणे किंवा विचित्र आवाज ऐकणे हे वाईट नजरेचे लक्षण असू शकते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)