डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुल सचिवाचा आत्महत्येचा प्रयत्न; चिठ्ठीत २ बड्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
Saam TV July 10, 2025 03:45 PM

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुल सचिवाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आत्महत्येचा प्रयत्न करण्याआआधी चिठ्ठी देखील लिहिली. उपकुल सचिवाच्या आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटनेने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

हेमलता ठाकरे असं या विद्यापीठाच्या उपकुल सचिवांचं नाव आहे. हेमलता ठाकरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर बेशुद्ध झाल्या. त्यानंतर बेशुद्धावस्थेत त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. ठाकरे यांनी आत्महत्या करण्याआधी चिठ्ठी लिहिली. या चिठ्ठीत दोन मोठ्या अधिकाऱ्यांचे नावे आहेत. कुलगुरू विजय फुलारी, कुलसचिव प्रशांत अमृतकर यांच्यावर गंभीर आरोप केले.

Shahapur News : टॉयलेटमध्ये रक्त आढळलं, विद्यार्थिनींची विवस्त्र करून तपासणी केली; शहापूरच्या इंग्लिश मीडियम शाळेतील प्रकार अधिकाऱ्यांवर छळाचा आरोप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ठाकरे यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हेमलता ठाकरे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत विद्यापीठाचे कुलगुरू विजय फुलारी, कुलसचिव प्रशांत अमृतकर यांनी छळ केल्याचा आरोप केला आहे. विविध कारणाने नोटीस काढून त्यांना छळले असा आरोप ठाकरे यांनी केला आहे. हेमलता ठाकरे यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे विद्यापीठात एकच खळबळ उडाली आहे.

Amit Shah : राजकीय निवृत्तीनंतर काय करणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितला प्लान

महिना भरापूर्वी ठाकरे यांनी आपल्याला कर्मचारीदेत नसल्याने डोक्यावर फाइल्स घेऊन दुसऱ्या विभागात बदलीच्या ठिकाणी रुजू झाल्या होत्या. त्यामुळे हेमलता ठाकरे चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर आता त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्येच्या प्रयत्नाआधी लिहिलेल्या चिठ्ठीत कुलगुरु आणि कुलसचिव त्रास देत असल्याचे म्हटले आहे.

Dhule News : माजी सैनिक चंदू चव्हाणांना पालिका कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण, नेमकं काय घडलं? VIDEO
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.