Maharashtra Live Updates : डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा नवी खेळी, 22 देशांना पत्र पाठवत टेरिफ कर लागू करण्याची केली घोषणा
Sarkarnama July 10, 2025 04:45 PM
Amit Shah : गृहमंत्री अमित शहांनी सांगितला निवृत्तीनंतरचा प्लॅन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. राजकीय निवृत्तीनंतर पुढील आयुष्यात काय करणार हे त्यांनी सांगितलं आहे. अहमदाबादमधील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, "राजकारणातून निवृत्त झाल्यावर मी आयुष्यभर नैसर्गिक शेती करायचं ठरवलं आहे. शिवाय निवृत्तीनंतरचं आयुष्य वेद, उपनिषद वाचण्यात घालवणार आहे."

आषाढी एकादशीनिमित्त 10 लाख वारकऱ्यांनी घेतलं विठुरायाचं दर्शन

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून सुमारे 20 लाखाहून अधिक भाविकांनी हजेरी लावली होती. यामध्ये सुमारे दहा लाख भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्याची मंदिर समितीकडे नोंद झाली आहे.

Donald Trump new Tariff policy : डोनाल्ड ट्रम्प यांनी 22 देशांना पत्र पाठवली

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी पुन्हा एकदा जगभरातील विविध देशांवर टेरिफ लागू करण्याचा आदेश काढला आहे. याबाबत अमेरिकेने 22 देशांना पत्र पाठवत नवे टेरिफ दर किती असणार याबाबतची माहिती देण्यात आली आहे. फिलिपाईन्स, श्रीलंका, ब्रुनेई, अल्जेरिया, लिबिया, इराक, मॉलडोव्हा आणि ब्राझील या देशांवर अमेरिकेने 20 ते 50 टक्के टेरिफ आकारला आहे. 1 ऑगस्टपासून हे नवे दर लागू होणार आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.