Maharashtra Live News Update : शिर्डीमध्ये गुरूपोर्णिमेनिमित्त भाविकांची अलोट गर्दी
Saam TV July 10, 2025 04:45 PM
एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट, सेटमधून सूट

राज्यातील एक हजार ४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा

दीर्घकाळ सेवेत असूनही राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांतील एम.फिल अर्हताधारक प्राध्यापकांना या अर्हतेचा लाभ गेल्या २५ वर्षांपासून मिळत नव्हता

आता विद्यापीठ अनुदान आयोगाने एम.फिल पात्रता धारक प्राध्यापकांना त्या अर्हतेचा लाभ देण्याचा प्रश्न निकाली काढला आहे

राज्यातील एक हजार ४२१ प्राध्यापकांना एम.फिल अर्हतेच्या तारखेपासून नेट/सेट परीक्षेतून सूट देण्यास आयोगाने अखेर मान्यता दिली आहे

गडचिरोली आणि नागपूर येथे विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेतला

- अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी गडचिरोली आणि नागपूर येथे 2 हेलिकॉप्टरसह भारतीय सैन्य दलाची चमू सज्ज

- विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेतला

- नागपूर आणि वर्धा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असल्याने येथे एनडीआरएफ आणि एसडीआरएफची चमू सज्ज ठेवण्यात आली आहे

- जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार मदत व बचाव कार्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिली.

Maharashtra Live News Update : शिर्डीमध्ये गुरूपोर्णिमेनिमित्त भाविकांची अलोट गर्दी

साई मंदिराचे दर्शन कॉम्प्लेक्स हाऊसफुल...

नगर मनमाड महामार्गावर तिन ते चार किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा...

दर्शनासाठी लागतायत चार ते पाच तास...

संस्थान सुरक्षा रक्षकांची मोठी दमछाक...

साईनामाचा जयघोषात भाविक होतायत साईचरणी नतमस्तक...

उत्सवानिमीत्त आज साई मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या बुधवार रात्री आठ वाजता जाहीर करण्यात आल्या

परिषदेच्या 'www.mscepune.in' व 'https://puppssmsce.in' या संकेतस्थळावर निकाल जाहीर करण्यात आला

इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत एक लाख ३० हजार ८४६ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र असून त्यातील १६ हजार ६९३ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले

इयत्ता आठवीतील ७० हजार ५७१ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र असून त्यातील १५ हजार ९३ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक आहेत

राज्य परीक्षा परिषदेतर्फे नऊ फेब्रुवारी रोजी ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती

इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यातील पाच लाख ४७ हजार ५०४ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा दिली

आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तीन लाख ६५ हजार ७५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली

सरकारी कार्यालयात बर्थडे साजरे केले तर थेट कारवाई

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोणत्याही सरकारी कार्यालयात बर्थडे साजरे केले तर थेट कारवाई केली जाणार आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्व सरकारी विभागांसाठी एक परिपत्रक काढले आहे. जिल्ह्यातील विविध सरकारी कार्यालयांमध्ये सर्रासपणे अधिकारी-कर्मचारी यांचे वाढदिवस साजरे केले जातात. नागरिकांना बाहेर ताटकळत ठेवून आत केक कापला जातो. परंतु यापुढे सरकारी कार्यालयात वाढदिवस साजरे केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला आहे. जिल्ह्यात महसूल, कृषी, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महावितरण, जलसंपदा, जलसंधारण, सिडको, नगर परिषदा, पोलिस, सार्वजनिक आरोग्य, पशूसंवर्धन विभाग, शिक्षण, सहकार, समाजकल्याण अशा विविध सरकारी खात्यांची कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये कामानिमित्त दररोज असंख्य नागरिक येत असतात. परंतु काही वेळा कार्यालयीन वेळेतच अधिकारी कर्मचारी यांचे वाढदिवस साजरे केले जातात. केक कापला जातो. तोपर्यंत नागरिकांना बाहेर ताटकळत थांबावे लागते. नियमानुसार कोणत्याही शासकीय कार्यालयात वाढदिवस किंवा इतर प्रकारचे उत्सव साजरे करता येत नाहीत. तरीदेखील या नियमाकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे आता बर्थ डे साजरे करताना आढळून आल्यास संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.

चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात रात्री पावसाची उसंत

चंद्रपूर आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्यात काल रात्री पावसाने उसंत दिल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात उद्भवलेली पूर परिस्थिती नियंत्रणात येण्यास काही प्रमाणात मदत होणार आहे. गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्याने आणि गेले दोन दिवस चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास सव्वा तीनशे मिलिमीटर पाऊस झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र काल रात्री पाऊस न झाल्याने आता फक्त गोसेखुर्द धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ दिसून येत आहे. त्यामुळे गोसेखुर्द धरणातील विसर्ग कमी झाल्यास पूर परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येऊ शकते.

आषाढीवारी काळात 10 लाख भाविकांचे विठ्ठल दर्शन

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून सुमारे 20 लाखाहून अधिक भाविकांनी हजेरी लावली होती. यामध्ये सुमारे दहा लाख भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्याची मंदिर समितीकडे नोंद झाली आहे. 4 लाख 54 हजार भाविकांनी दर्शन रांगेत उभे राहून देवाचे पदस्पर्श दर्शन घेतले तर 5 लाख 47 हजार भाविकांनी मुख दर्शन घेतले. अजून ही हजारो भाविक दर्शनरांगेत उभे आहेत. आज गोपाळकाल्याने आषाढीची सांगता होणार आहे. सर्व संतांच्या पालख्या देवाच्या भेटीला जाणार आहेत. संत आणि देव भेटी नंतर दुपारी पालख्या परतीच्या प्रवासाला निघतील.

गुरु पौर्णिमे निमीत्त गजानन महाराज मंदिरात भाविकांची गर्दी

गुरु पौर्णिमे निमित्त विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगाव येथील संत गजानन महाराज समाधी मंदिरात असंख्य भाविकांनी गर्दी केलेली आहे.. जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरु असताना सुद्धा भाविक शेगावात दाखल झाले आहे.. आज सकाळपासूनच शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात राज्याच्या काण्या कोपऱ्यातून हजारो दर्शनासाठी पोहोचले आहेत... तसेच शेजारील मध्य प्रदेश गुजरात मधून सुद्धा असंख्य भाविक शेगावात दाखल झाले आहेत्

Maharashtra Live News Update : धक्कादायक! सहा महिन्यांत पश्चिम विदर्भात ५२७ शेतकऱ्यांची आत्महत्या

पश्चिम विदर्भात म्हणजेच अमरावती, यवतमाळ,वाशिम, बुलढाणा आणी आकोला या पाच जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र वाढतेच आहे.यंदा सहा महिन्यात म्हणजेच जून अखेर ५२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक यवतमाळ जिल्ह्यात १७८ आत्महत्या आहे. दर आठ तासात एक शेतकरी मृत्यूचा फास आवळत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.नैसर्गिक आपत्ती,नापिकी, दुष्काळ,बँकांचे व सावकारांचे कर्ज, कर्ज वसुलीचा तगादा,मुलींचे लग्न, आजारपण यासह अनेक कारणांमुळे पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचे वास्तव आहे.यावर मात करण्यासाठी शासन-प्रशासन गंभीर नसल्याने शेतकऱ्यांच्या समस्या वाढलेल्या आहेत.अमरावती विभागीय आयुक्तालयाच्या अहवालानुसार जानेवारी ते जून २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधित तब्बल ५२७ शेतकरी आत्महत्या झाल्या

भंडाऱ्यात आज शाळांना दिली आज सुट्टी

भंडारा जिल्ह्यात हवामान विभागानं रेड अलर्ट दिलाय.तीन दिवसापासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडतोय. परिणामी, भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर केली आहे. मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातील जवळपास 90 मार्ग पाण्याखाली आल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

साईंच्या शिर्डीत गुरुपौर्णिमेचा उत्साह

शिर्डीच्या साई मंदिरात साजरा केल्या जाणाऱ्या तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाचा आज मुख्य दिवस आहे.. आज सकाळपासून साई समाधीसह गुरुस्थान मंदिराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.. साईबाबांना गुरुस्थानी मानून दरवर्षी लाखो साईभक्त शिर्डीत दर्शनासाठी येत असतात.. आज देखील सकाळपासूनच भाविकांचा मोठा उत्साह दिसून येतोय.. साई समाधी मंदिरासह परिसरातील मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे.

गडचिरोलीत वाहनांच्या लागल्या रांगा

मागील चोवीस तासांपासून ब्रम्हपुरी गडचिरोली मार्ग बंद असल्याने वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. वाहनांच्या लांब रांगा ब्रम्हपुरी शहरात कालपासून बघायला मिळत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुका हा गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत आहे. इथून गडचिरोलीला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला वडसा आणि दुसरा आरमोरी मार्ग आहे. मात्र संततधार पावसाने हे दोन्ही मार्ग भूती नाल्याला पूर असल्याने बंद आहेत. त्यामुळे प्रवासी आणि माल वाहतूक करणारी सर्व वाहने जागच्या जागी आहेत. लांबचलांब रांगा रस्त्याच्या दुतर्फा लागल्या आहेत.

वाहतूक विभागातील कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पुणे पोलिस दलातील वाहतूक विभागातील कर्मचारी यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

धनाजी भरत वणवे असे पोलिस कर्मचारी यांचे नाव आहे

काल संध्याकाळी ड्युटी करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला

वणवे भारती विद्यापीठ विभागाच्या वाहतूक विभागात कार्यरत होते

काल संध्याकाळी पावणे ७ वाजण्याच्या वणवे यांचे कात्रज मंडई चौकात कर्तव्यावर असताना अचानक चक्कर येऊन कोसळले. त्यांना तत्काळ साई स्नेह रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच त्यांचे तीव्र हृदय विकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले चे वैद्यकीय अधिकारी यांनी स्पष्ट केले

त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी मुलगी व मुलगा शिवराज असा परिवार आहे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.