आजच्या घडीला अनेकजण वजन वाढ, अपचन, थकवा, कमी ऊर्जा या तक्रारींनी त्रस्त आहेत. त्यामागे एक मोठं कारण म्हणजे अन्नाचं चुकीचं प्रमाण. आपण खूप वेळा विचार करतो की ‘आज खूप खाल्लं’, पण नेमकं किती अन्न खाणं शरीरासाठी योग्य आहे, हे फार कमी लोकांना ठाऊक असतं.आज आपण जाणून घेणार आहोत की, रोज किती अन्न खावं, ते कोणत्या घटकांवर अवलंबून असतं, आणि या आहाराचं प्रमाण ठरवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. (how much food should we eat daily)
शोधांनुसार, ताटात जास्त अन्न असेल तर माणूस अधिक खातो. याला ‘पोर्शन साईज इफेक्ट’ म्हटलं जातं. काही दशकांपूर्वी जेवणाचं प्रमाण कमी होतं, ताटं लहान होती, आणि आपली खाण्याची सवयही नियंत्रित होती.
1970 च्या दशकात एका ताटाचा सरासरी आकार 22 सेमी होता. आज तो 28 सेमी झाला आहे. एवढी वाढ आपल्या अन्नाच्या प्रमाणात थेट वाढ घडवून आणते.
अन्न अधिक खाण्यामागची कारणं
– जाहिराती आणि मार्केटिंगचा प्रभाव
– प्रोसेस केलेल्या अन्नपदार्थांवर अंध विश्वास
– रेस्टॉरंट्समध्ये दिलं जाणारं अन्नाचं अधिक प्रमाण
– मोठ्या प्लेट्सचा वापर
– घरगुती स्वयंपाकाचे ‘खमंग’ सल्ले
आहार तज्ज्ञ सांगतात: ‘तुमच्या हाताचं प्रमाण ठरवू शकतं योग्य अन्न
प्रत्येकाची ऊर्जा गरज वेगळी असते, त्यामुळे आहाराचं प्रमाण ठरवताना वय, लिंग, वजन, उंची आणि शारीरिक काम यांचा विचार केला पाहिजे. पण एक साधा आणि सोपा मार्ग म्हणजे ‘हातांवर आधारित मोजमाप;:
– मांस / पनीर – आपल्या तळहाताएवढं
– चिकन / मासे – संपूर्ण हाताएवढं
– भाजीपाला – एक मूठभर
– कार्बोहायड्रेट्स (बटाटे, तांदूळ इ.) एक मूठभर
– फळं – एक मूठभर
किती कॅलरी गरजेच्या?
– स्त्रिया: सरासरी 2000 कॅलरी/दिवस
– पुरुष: सरासरी 2500 कॅलरी/दिवस
पण लक्षात ठेवा हे सरासरी आकडे आहेत. प्रत्येक व्यक्तीची शरीरयष्टी, कामाची पद्धत, जीवनशैली, आणि आरोग्य स्थिती वेगळी असते. त्यामुळे नेहमी स्वतःच्या गरजेनुसार आहार ठरवणं आवश्यक आहे.
योग्य प्रमाणात अन्न खाण्याचे फायदे
1)वजन नियंत्रणात राहतं
2) पचनक्रिया सुरळीत होते
3) थकवा कमी होतो
4) ऊर्जा वाढते
5) रोगप्रतिकारशक्ती सुधारते
अति अन्न सेवनाचे धोके
1) वजन वाढ
2) साखर आणि कोलेस्टेरॉल वाढ
3) अपचन, गॅसेस, बद्धकोष्ठता
4) लठ्ठपणाशी संबंधित आजार
आपण काय खातो आणि किती खातो, हे शरीरावर खोल परिणाम करणारी गोष्ट आहे. अन्न हे शरीरासाठी औषधासारखं आहे, पण तेच अन्न चुकीच्या प्रमाणात घेतल्यास ते हानिकारक ठरू शकतं. म्हणूनच आजपासून अन्नाचं प्रमाण स्वतःच्या गरजेनुसार ठरवा, मोठ्या ताटांऐवजी योग्य आकाराच्या भांड्यांचा वापर करा आणि पोषणमूल्य असलेल्या अन्नपदार्थांनाच प्राधान्य द्या.