पृथ्वीतलावर पाणी मुबलक प्रमाणात आढळते. पाण्याचे अनेक स्त्रोत आहेत जसे की, महासागर, नदी, तलाव, भूर्गभातील पाणी आदी. तरीही जगभरातील अनेक ठिकाणी स्वच्छ पाणी, पिण्यायोग्य पाणी न मिळण्याची समस्या भेडसावत आहे. अशावेळी अनेकांना प्रश्न पडतो की, पावसाचे पाणी पिऊ शकतो का? दरवर्षी इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर ही बातमी शेवटपर्यत वाचावी. पावसाचे पाणी वापरून शेती करणारे अनेकजण आपण पाहतो. यासोबतच पावसाचे पाणी विविध कामांसाठी वापरले जाते. पण, पावसाचे पाणी प्यायल्यावर आरोग्यावर काय परिणाम होतो? पावसाचे पाणी पिण्यासाठी कितपत सुरक्षित आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? जाणून घेऊयात आजच्या लेखातून या प्रश्नांची उत्तरे (Is The Rain Water safe To Drink)
फार पूर्वी पावसाचे पाणी हे स्वच्छ आणि निथळ असायचे. त्यामुळे ते पिण्यायोग्य मानले जायचे. पण, आता परिस्थिती बदलली आहे. प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरी भागांमध्ये आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये, पावसाच्या पाण्यात रसायने आणि हानिकारक बॅक्टेरिया असण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे असे दूषित पाणी तुम्ही जर प्यायलात तर आजार उद्भवू शकतात. दुसरं म्हणजे हे पाणी नळाला येणाऱ्या पाण्यापेक्षा अधिक क्षारयुक्त असते. ज्यामुळे तुम्हाला वायरल इन्फेक्शन होऊ शकते. याशिवाय ढगांमधून जमिनीवर येताना हे पाणी धूळ, माती आणि इतर सुक्ष्म कण आपल्योसोबत घेऊन येते, ज्यामुळे पावसाचे पाणी पिण्यासाठी अयोग्य बनते.
आयुर्वेद काय सांगते ?
आयुर्वेदानुसार, पावसाचे पाणी अतिशय काळजीपूर्वक प्यायला हवे. खरं तर, हे पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. फक्त आपण ते कसे गोळा करतो त्यावर सर्व अवलंबून असते.
या कामांसाठी वापरा पाणी –
हे पाणी साठवून तुम्ही घरातील इतर कामांसाठी वापरू शकता. जसे की, भांडी, कपडे धुण्यासाठी, फरशी पुसण्यासाठी. याव्यतिरिक्त पाण्याची कमतरता असे तर पावसाचे पाणी उकळवून तुम्ही पिऊ शकता.
पाणी पिण्यायोग्य बनवण्यासाठी उपाय –
जर तुम्हाला पावसाचे पाणी पिण्यासाठी वापरायचे असेल तर ते शुद्ध करण्यासाठी योग्य प्रक्रिया करणे आवश्यक आहे. यामध्ये गाळणे, उकळणे आणि शुद्धीकरण करणे यांसारख्या पद्धतींचा अवलंब करायला हवा. तुम्ही रेनवॉटर हार्वेस्टिंग (Rainwater Harvesting System) वापरून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साठवू शकता. यानंतर त्यावर योग्य प्रक्रिया करून पिण्यायोग्य बनवू शकता.
हेही पाहा –