बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?
esakal July 11, 2025 07:45 PM

Beed land Dispute : बीड जिल्ह्यातील साक्षाळ पिंपरी येथे शेतजमिनीच्या वादातून माजी सरपंचाने (Ex-Sarpanch) एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करत गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

डोक्यात धारदार शस्त्राने वार, तरुण रक्तबंबाळ

बीड ग्रामीण पोलीस ठाणे (Beed Rural Police Station) क्षेत्रात येणाऱ्या साक्षाळ पिंपरी येथे जमिनीच्या वादातून वाद विकोपाला गेल्यानंतर गावच्या माजी सरपंचाने संबंधित तरुणाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर बीडमधील लोटस खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

Pune: गॅस खरेदी करताय? सावधान! 2 ते 3 किलो गॅसची होतेय चोरी; तरुणांच्या सतर्कतेमुळे काळाबाजार उघड, पुण्यात काय घडलं? पोलिस तक्रार घेण्यास टाळाटाळ?

पीडित कुटुंबाने पोलिसांवर गंभीर आरोप करत सांगितले की, वारंवार प्रयत्न करूनही पोलिस तक्रार दाखल करून घेत नाहीत. राजकीय दबावामुळे पोलिसांनी FIR नोंदवण्यास नकार दिला, असा आरोप करत पीडितांनी थेट पोलिस अधिक्षकांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे.

1500 हिंदू मुलींचं धर्मांतर करणारा छांगूर उर्फ पीर बाबा कसा झाला 300 कोटींचा मालक? ATS तपासातून धक्कादायक माहिती उघड न्यायासाठी कुटुंबाची धावपळ

जखमी तरुणाच्या कुटुंबीयांनी आज बीडच्या पोलिस अधिक्षकांची भेट घेत न्यायाची मागणी केलीये. त्यांनी म्हटले की, 'अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई झाली पाहिजे. आमच्यावर अन्याय झाला आहे आणि पोलिस केवळ राजकीय दबावामुळे गप्प आहेत.' या घटनेबाबत बीड ग्रामीण पोलिसांकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. मात्र, स्थानिक पातळीवर या घटनेबाबत संतापाची लाट असून, नागरिकांनी गुन्हेगारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.