टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने तिसर्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी इंग्लंडला झटपट 3 झटके देत अप्रतिम सुरुवात केली आहे. बुमराहने दिवसाच्या खेळाच्याच सुरुवातीला एक नाही, दोन नाही तर तब्बल 3 झटके दिले. त्यामुळे इंग्लंडची 4 आऊट 251 वरुन 7 आऊट 271 अशी झाली. बुमराहने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स, जो रुट आणि ख्रिस वोक्स या त्रिकुटाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
इंग्लंडसाठी जो रुट आणि बेन स्टोक्स या जोडीने दुसऱ्या दिवसाच्या खेळाला 84 व्या ओव्हरपासून 4 आऊट 251 रन्सवरुन सुरुवात केली. बुमराह इंग्लंडच्या डावातील 86 वी ओव्हर टाकायला आला. बुमराहने दुसऱ्याच बॉलवर इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स याला क्लिन बोल्ड केलं. स्टोक्सने 110 बॉलमध्ये 4 फोरसह 44 रन्स केल्या. बुमराहने अशाप्रकारे टीम इंडियाला दुसऱ्या दिवसातील पहिली विकेट मिळवून दिली.
बुमराह त्यानंतर 88 वी ओव्हर घेऊन आला. बुमराहने या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर टीम इंडियाची सर्वात मोठी डोकेदुखी दूर केली. बुमराहने जो रुट यालाही क्लिन बोल्ड केलं. जो रुट याने 199 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 104 धावा केल्या. बुमराहची रुटला कसोटी क्रिकेटमध्ये आऊट करण्याची ही 11 वेळ ठरली.
रुट आऊट झाला मात्र त्याने शतकासह मोठा विक्रम केला. रुटने कसोटीतील 37 वं शतक ठोकलं. रुटने यासह राहुल द्रविड याच्या 36 शतकांचा विक्रम मोडीत काढला.
बुमराहची कमाल, इंग्लंडला झटपट 3 झटके
रुट आऊट झाल्यानंतर ख्रिस वोक्स मैदानात आला. बुमराहने वोक्सला आला तसाच बाहेर पाठवला. बुमराहने वोक्सला सबस्टीट्युड विकेटकीपर ध्रुव जुरेल याच्या हाती कॅच आऊट केलं. त्यामुळे बुमराहला आता हॅटट्रिकची संधी होती. मात्र बुमराहला हॅटट्रिक घेता आली नाही. मात्र बुमराहने झटपट 3 झटके देत टीम इंडियाला चांगली सुरुवात मिळवून दिली इतकी मात्र खरं. आता भारताचा उर्वरित 3 विकेट्सही झटपट घेऊन इंग्लंडला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न असणार आहे.
दरम्यान जसप्रीत बुमराह याला दुसऱ्या कसोटी सामन्यात वर्कलोड मॅनेजमेंटमुळे विश्रांती देण्यात आली हीत. मात्र त्यानंतर तिसऱ्या सामन्यातून बुमराहने कमबॅक केलं. बुमराहच्या कमबॅकमुळे प्रसिध कृष्णा याला प्लेइंग ईलेव्हनमधून डच्चू देण्यात आला. दुसऱ्या सामन्यात बुमराहच्या जागी आकाश दीप याचा समावेश करण्यात आला होता. मात्र आकाशने 10 विकेट्स घेतल्या. प्रसिध कृष्णाला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे बुमराहसाठी प्रसिधला प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.