टी 20i मालिकेसाठी कर्णधार बदलला, RCB च्या गोलंदाजाला विश्रांती, टीम मॅनेजमेंटचा मोठा निर्णय, कुणाचा समावेश?
GH News July 12, 2025 08:05 PM

वेस्टइंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यांतील तिसरा कसोटी सामना हा किंग्स्टमध्ये खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया या 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. तर तिसरा सामना 13 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर उभयसंघात 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला 21 जुलैपासून सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाकडून याबाबतची माहिची सोशल मीडियावरुन देण्यात आली आहे.

निवड समितीने या मालिकेतील 5 सामन्यांसाठी 15 खेळाडूंची निवड केली आहे. ऑस्ट्रेलिया संघात 2 बदल करण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स याला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे विंडीज विरूद्धच्या या मालिकेत नवा खेळाडू ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे.

तसेच आरसीबीला आयपीएल 2025 ट्रॉफी जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावणारा जोश हेझलवूड यालाही विश्रांती देण्यात आली आहे.जोशने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील एकूण 12 सामन्यांमध्ये 22 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच जोशने ऑस्ट्रेलियाचं 52 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. जोशने या 52 सामन्यांमध्ये 67 विकेट्स घेतल्या आहेत. हेझलवूडने विंडीज विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. हेझलवूडने विंडीज विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत 11 विकेट्स घेतल्या.

मिचेल मार्शकडे नेतृत्वाची जबाबदारी

पॅट कमिन्स याला विश्रांती देण्यात आल्याने मिचेल मार्श ऑस्ट्रेलियाचं या मालिकेत नेतृत्व करणार आहे. पॅटने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतूनही माघार घेतली आहे. पॅटने आगामी आणि प्रतिष्ठेच्या एशेस 2025-2026 सीरिजसाठी हा निर्णय घेतला आहे. तसेच ऑस्ट्रेलिया संघात मिचेल ओव्हन आणि मॅट कुहेनमॅन या दोघांना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे.

टी 20i मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 20 जुलै, जमैका

दुसरा सामना, 22 जुलै, जमैका

तिसरा सामना, 25 जुलै, वॉर्नर पार्क, बासेटेरे, सेंट किट्स

चौथा सामना, 26 जुलै, वॉर्नर पार्क, बासेटेरे, सेंट किट्स

पाचवा सामना, 28 जुलै, वॉर्नर पार्क, बासेटेरे, सेंट किट्स

टी 20i मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर

टी 20i मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया टीम : मिचेल मार्श (कर्णधार), सीन एबॉट, कूपर कोनोली, टीम डेव्हीड, बेन ड्वार्शिस, नाथन एलिस, कॅमरून ग्रीन, आरोन हार्डी, जॉश इंग्लिस, स्पेंसर जॉनसन, मॅट कुहनेमॅन, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल ओवन, मॅथ्यू शॉर्ट आणि एडम झॅम्पा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.