सर्वसामान्याकडे पैसे सापडले तर कारवाई होते, मग शिरसाटांना वेगळा न्याय का? खासदार अमर काळे यांचा सवाल
Marathi July 12, 2025 10:25 PM

सर्वसामान्याकडे पैसे सापडले तर कारवाई होते, मग शिरसाटांना वेगळा न्याय का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांनी उपस्थित केला आहे. अलीकडेच मिंधे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांचा नोटांनी भरलेली बॅग आणि हातात सिगारेट धरत फोनवर बोलतानाचा बेडरूममधील एक व्हिडीओ समोर आला होता. यावरच आपली प्रतिक्रिया देताना ते असं म्हणाले आहेत.

वर्धा येथे माध्यमांशी संवाद साधताना खासदार अमर काळे म्हणाले की, “संजय शिरसाट यांचा व्हिडीओ मी पाहिला. व्हिडीओ संजय शिरसाट स्वतःच्या रूममध्ये बसलेले दिसत आहे आणि त्यांच्या बॅग आहे. त्या बॅगमध्ये जो पैसे आहे, तो क्लिअर कट दिसत आहे.”

ते पुढे म्हणाले की, “माझी इतकीच अपेक्षा आहे की, इतका पैसे त्यांच्याकडे आला कसा? याची सरकारने दखल घेतली पाहिजे. हा पैसे कोणाचा होता? जर एखाद्याकडे थोडी फारही अधिकची संपत्ती आढळली तर, तात्काळ त्यावर कारवाई केली जाते. माझी अपेक्षा आहे की, जो सर्वसामान्यांना न्याय आहे, तोच न्याय मंत्र्यांना सुद्धा असावा.”

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.