Panchamrut : पंचामृत पिण्याचे फायदे
Marathi July 14, 2025 06:25 PM

आपल्याकडे सणासुदीला पूजेच्या निमित्ताने हमखास पंचामृत बनवलं जातं. लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे. श्रावणात प्रत्येक सणावाराला काहीतरी गोडधोडाच्या पदार्थांसोबत नैवेद्यात पंचामृत बनवलं जातं. पंचामृताला ‘चरणामृत’ असंही म्हटलं जातं. पूजेदरम्यान पंचामृत देवाला दाखवून मग ते प्रसाद म्हणून दिलं जातं. पंचामृत म्हणजे पाच प्रकारच्या अमृताचं मिश्रण असते. धार्मिक विधीत पंचामृत अतिशय महत्त्वाचे असते. नैवैद्यासाठी बनवल्या जाणाऱ्या या पंचामृतात 5 प्रकारचे घटक असतात. हे घटक शरीरासाठी लाभदायी असतात. आज आपण जाणून घेऊयात पंचामृताचा शरीराला कसा फायदा होतो.

पंचामृतातील घटक –

दही दह्यात लॅक्टोबॅसिलस नावाचा जिवाणू असतो, जो आतड्यांची कार्यक्षमता वाढवतो.

दूध दुधात कॅल्शियम असते.

मध – मधामध्ये ऍटीऑक्सिडंट्स असतात.

साखर – साखरेमुळे शरीराला ऊर्जा मिळते.

तूप – तूपामध्ये व्हिटॅमिन ए, बी, इ, के असतात.

पंचामृताचे फायदे –

रोगप्रतिकारकशक्ती वाढते –

पंचामृतामध्ये असलेले दही, दूध आणि मध ऍटी-ऑक्सिडंट्स आणि आवश्यक पोषकतत्वांनी परिपूर्ण असतात. या पोषकतत्वांमुळे रोगप्रतिकारकशक्ती अधिक मजबूत होते.

संक्रमणापासून संरक्षण –

पंचामृत प्यायल्याने पावसाळ्यातील विविध बॅक्टेरियांपासून संरक्षण होते.

पचनक्रिया सुधारते –

पंचामृत पचनासाठी देखील फायदेशीर आहे. पचनक्रिया सुधारण्यासाठी पंचामृतातील घटक फायदेशीर असतात.

ऊर्जा वाढवते –

पंचामृत केल्याने शरीराला आवश्यक ऊर्जा आणि ताकद मिळते. त्यामुळे शरीराला एनर्जेटिक ठेवण्यासाठी तुम्ही पंचामृत प्यायला हवे.

त्वचेसाठी फायदेशीर –

पंचामृत प्यायल्याने त्वचा निरोगी आणि चमकदार होते.

केसांसाठी लाभदायी –

पंचामृत केसांसाठी लाभदायी आहे. केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी पंचामृत प्यायला हवे.

हाडे मजबूत होतात –

दुधात कॅल्शियम आढळते. कॅल्शियममुळे हाडांच्या मजूबतीला चालना मिळते.

हेही महत्त्वाचं –

  • नेहमी ताजं बनवलेलं पंचामृतच प्यावे.
  • पंचामृतात दही घातलं जाते. ज्यामुळे काही वेळाने ते आंबट होते.
  • आयुर्वेदानुसार पंचामृत बनवताना तूप आणि मधाचं प्रमाण सम असावे.
  • पंचामृत बनवण्यासाठी स्टेनलिस स्टील, सिरॅमिक किंवा काचेच्या भांड्याचा वापर करावा.

टीप –

तुम्ही रोज सकाळी चांदीच्या वाटीत किंवा साध्या वाटीत दही, साख्र, तूप. मध प्रत्येकी 1 चमचा आणि 3 ते 4 चमचे दूध टाकून तयार करून प्यावे.

 

 

हेही पाहा –

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.