खळबळजनक! मालेगावातील नामांकित हॉस्पिटलमध्ये नर्सिंग कोर्स करणाऱ्या 16 वर्षीय तरुणीवर अत्याचार
Marathi July 16, 2025 03:25 PM

मालेगाव गुन्हेगारीच्या बातम्या: मालेगावातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये नर्सिंग कोर्सच्या माध्यमातून प्रॅक्टिस करणाऱ्या एका 16 वर्षीय तरुणीवर हॉस्पिटलमधीलच एकाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक प्रकार उजेडात आला आहे. मोहम्मद अथर खुर्शिद अहमद याने हा लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना 13 जुलैला पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास घडली आहे. मोहम्मद अथर खुर्शिद अहमद याने या नर्सिंग कोर्स करणाऱ्या पीडितेला एक फोटो दाखवत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केलाय.

घडलेल्या प्रकाराबाबत पीडितेने मैत्रिणीकडे व कुटुंबियांकडे वाच्यता केली असता हा प्रकार उजेडात आला आहे. यानंतर या प्रकरणी  पीडित तरुणीने छावणी पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला. दरम्यान, संशयित मोहम्मद अथर खुर्शिद अहमद याच्यावर पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.

मतिमंद तरुणीवर अत्याचार; तुमसरमध्ये आरोपी तरुणाला पोलिसांनी केली अटक

मतिमंद तरुणी घरी एकटीचं असल्याचं बघून घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणानं तिच्यावर बळजबरी केली. ही संपूर्ण आपबिती पीडितानं कुटुंबीय सायंकाळी घरी आल्यावर हातवारे करीत आणि आरोपीच्या घरी नेतं सांगितली. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून तुमसर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली. अनिकेत बन्सोड (२९) असं आरोपीचं नावं असून ही घटना तुमसर तालुक्यात घडली आहे. सध्या खरीप हंगाम सुरू असल्यानं पीडितेचे कुटुंबीय शेतावर गेले असताना ही घटना घडली.

राज्यात महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलं, गृह विभागाची कबुली

राज्यात महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलं असल्याची माहिती समोर आली असून गृह विभागाने विधान परिषदेत या बाबत कबुली दिली आहे. गृह खात्याकडून लेखी उत्तरात आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. नागपूर शहरात जानेवारी 2024 ते मे 2025 अखेर पर्यंत एकूण 5897 जण बेपत्ता झाले आहेत. महिला व पुरुष 4923 बेपत्ता झाले आहेत तर 776 मुली व मुळे बेपत्ता झाले आहेत. महाराष्ट्र पोलीस सर्विस फॉर सिटीझेन पोर्टल या संकेतस्थळावर  2024 ते 2025 या कालावधीत अठरा वर्षाखालील बेपत्ता मुलींची संख्या 4096, तसेच 18 वर्षावरील बेपत्ता पत्ता महिलांची संख्या 33599 अशी दर्शवण्यात आली आहे.  2021 ते 2025 या चार वर्षाच्या कालावधीत अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि छेडछाडीचे एकूण 16160 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्यात हरवलेल्या महिला व बालकांसाठी ऑपरेशन शोध ही विशेष मोहीम प्रत्येक स्तरावर राबविण्यात आली आहे.

हे ही वाचा

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.