Devendra Fadnavis Offer Uddhav Thackeray : इकडे येण्याचा स्कोप आहे, फडणवीसांची उद्धव ठाकरेंना ऑफर
Marathi July 16, 2025 07:25 PM

Devendra Fadnavis Offer Uddhav Thackeray : इकडे येण्याचा स्कोप आहे, फडणवीसांची उद्धव ठाकरेंना ऑफर

मुंबई : आधी सभागृहाच्या परिसरात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली आणि नंतर सभागृहात फडणवीसांनी केलेल्या एका जाहीर वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना थेट सभागृहात ऑफर दिली आहे. आम्हाला विरोधी पक्षात जाण्याचा स्कोप 2029 पर्यंत नाही, मात्र तुम्हाला मात्र इकडे येण्याचा स्कोप असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीसांच्या या वक्तव्याचे आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीचा शेवटचा दिवस होता. त्यांच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना जाहीर ऑफर दिली. त्या आधी या दोन्ही नेत्यांची सभागृहाबाहेरही भेट झाली होती.

उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याचा स्कोप

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धवजी आता 2029 पर्यंत काही करायचं नाही. आम्हाला तिकडे यायचा स्कोप उरला नाही. मात्र तुम्हाला इकडे यायचा स्कोप आहे. त्यावर वेगळ्या पद्धतीने विचार करता येईल. आपण वेगळ्या पद्धतीने बोलू.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.