फोटोसेशनवेळी शिंदेंच्या बाजूला खुर्ची, ठाकरेंनी शेजारी बसणे टाळलं, विधानभवनात नेमकं काय घडलं?
Marathi July 16, 2025 09:25 PM

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या निमित्तानं विधानभवनाच्या आवारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती नीलम गोऱ्हे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत फोटो सेशन करणं सुरु होतं.

अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभानिमित्त आयोजित फोटोसेशनला एकनाथ शिंदे आले आणि उपसभापती नीलम गोऱ्हे आणि सभापती राम शिंदे या दोघांच्या मध्ये बसले. एकनाथ शिंदे येताच फोटोसेशनला सुरुवात झाली.

अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभानिमित्त आयोजित फोटोसेशनला एकनाथ शिंदे आले आणि उपसभापती नीलम गोऱ्हे आणि सभापती राम शिंदे या दोघांच्या मध्ये बसले. एकनाथ शिंदे येताच फोटोसेशनला सुरुवात झाली.

थोड्याच वेळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तिथं दाखल झाले. उद्धव ठाकरे येताच सर्व नेते उठून उभे राहिले. या दरम्यान उद्धव ठाकरे नेमकं कोणत्या खुर्चीवर बसणार असा प्रश्न निर्माण झाला होता. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना नमस्कार केला.

गेल्या तीन वर्षांपासून जे दोन्ही नेते एकमेकांचे कट्टर विरोधक बनले आहेत. ते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या निमित्तानं एकाच फोटोत एकत्र आले. दोन्ही नेते एका फोटोत आले मात्र दोघांमध्ये संवाद झाला नाही.

अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या फोटोसेशनमध्ये उद्धव ठाकरे आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यामध्ये संवाद झाल्याचं पाहायला मिळालं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपसभापती नीलम गोऱ्हे, सभापती राम शिंदे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे , विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे पहिल्या रांगेत फोटोसेशनच्या वेळी खुर्चीवर बसले होते. उद्धव ठाकरे सभागृहातून बाहेर फोटोसेशन साठी आले. फोटो सेशनला आल्यानंतर पहिल्या रांगेत त्यांना नीलम गोऱ्हे यांनी बसण्यासाठी खुर्ची दिली.

उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांच्यात यावेळी चर्चा झाली. नीलम गोऱ्हे यांच्या बाजूला एकनाथ शिंदे बसले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नीलम गोऱ्हे यांच्या खुर्चीवर न बसता त्यांच्या बाजूची खुर्ची घेतली आणि बसले. त्या खुर्चीवर चंद्रशेखर बावनकुळे आधी बसले होते. फोटोमध्ये उद्धव ठाकरे त्यांच्या बाजूला नीलम गोऱ्हे आणि त्यांच्या बाजूला एकनाथ शिंदे  असा फोटो फोटोसेशन दरम्यान आला.

येथे प्रकाशित: 16 जुलै 2025 05:57 पंतप्रधान (आयएसटी)

राजकारण फोटो गॅलरी

आणखी पाहा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.