तुम्ही जुन्या काळातील ती गोष्ट तर ऐकलीच असेल, पूर्वी लोक आपल्या शेतात काम करायचे, शेतात काम करत असताना एखाद्या शेतकऱ्याला जमिनीमध्ये पुरलेलं धन मिळायचं आणि तो प्रचंड श्रीमंत व्हायचा. मात्र जर आजच्या काळात असं काही घडलं आहे, असं तुम्हाला कोणी सांगितलं तर तुम्हाला त्यावर विश्वास बसणार नाही, मात्र असं खरच घडलं आहे. ही घटना कोलंबियामध्ये राहणाऱ्या एका शेतकऱ्यासोबत घडली आहे.
हा शेतकरी आपल्या शेतात काम करत असताना त्याची कूदळ एका जागेवर अडकली, आणि या शेतकऱ्याच्या नशिबाचा दरवाजा उघडला. जोस मारिएना कार्टोलोस असं या 65 वर्षांच्या शेतकऱ्याचं नाव आहे, तो कोलंबियामधील एका छोट्या गावात राहातो. हा शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या परिवारासोबत शेती करून आपली उपजीविका करतो. या शेतकऱ्यानं आपल्या शेतात पाम ऑयलची झाडं लावली होती, त्यांना तो पाणी देत होता, झाडांना पाणी चांगल दिलं जाव म्हणून तो झाडांच्या मुळाशी खोदकाम देखील करत होता. जमीन खोदत असताना एका ठिकाणी त्याची कुदळ अडकली आणि त्याला त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठं सरप्राईज मिळालं.
त्याची कुदळ ज्या ठिकाणी अडकली त्या ठिकाणी एखादा मोठा दगड असावा असं त्याला वाटलं, त्याने ती जागा थोडी आणखी खोदली असता त्याच्या समोर एक निळ्या रंगाचा मोठा डबा समोर आला, त्याने उत्सुकतेपोटी तो डबा उघडला तर त्या डब्यात तब्बल 60 कोटी डॉलर म्हणजे 51,57,09,00,000 एवढे रुपये होते, हे पैसै पाहून तो आनंदी झाला.
मात्र त्यानंतर गावात अशी चर्चा सुरू झाली की हे धन कुख्यात ड्रग तस्कर पाब्लो एस्कोबार याचं आहे, त्याने या गावाच्या परिसरात अनेक ठिकाणी आपले पैसे पुरून ठेवले होते, ड्रग्जचे पैसे आपल्याला नको म्हणून या शेतकऱ्यानं याबाबत पोलिसांना माहिती दिली, पोलिसांनी हे पैसे ताब्यात घेतले, दरम्यान या परिसरात आणखी काही धन मिळू शकतं, या आशेनं आता सरकार सोबतच या गावातील संपूर्ण लोकांनीच खोदकाम सुरू केलं आहे.