चीनला भारतासह 19 देशांचे आव्हान, 40 हजार सैनिकांसह आतापर्यंत सर्वात मोठा युद्धसराव
GH News July 17, 2025 12:10 AM

सध्या जगात अनेक राष्ट्रात वाद सुरु आहेत.तर काही देशात युद्धासारखी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर १९ देश एकजुठ होऊन चीनला आव्हान देत आहेत. हा युद्धसराव तलिस्मान सेबर २०२५ नावाने होत आहे. या युद्धसरावाची गर्जना यावेळी ऑस्ट्रेलियासह पापुआ न्यु गिनीच्या जवळी समुद्री भागात ऐकायला मिळत आहे. या युद्धसरावात १९ देश सहभाग घेत आहे.भारताने पहिल्यांदाच तलिस्मान सेबर युद्धसरावात सहभाग घेतला आहे.

भारत सामील झाल्याने काय होणार ?

युद्धसरावात भारताच्या सहभागाने चीनला स्पष्ट संदेश दिलेला आहे. जर चीन भारताच्या सीमांवर किंवा हिंद-प्रशांत महासागरात आपल्या आक्रमक हालचाली सुरुच ठेवल्या तर एक मजबूत, एकजूट आणि तांत्रिकदृष्ट्या एक वेगवान आघाडी त्यास उत्तर देण्यास सज्ज आहे. ३५ ते ४० हजार सैनिकय या युद्धसरावात सहभागी आहे. आतापर्यंतचा सर्वात मोठा युद्धसराव आहे. तलिस्मान सेबरचा अर्थ जादुई तलवार असा होतो. अशा प्रकारे ही चीनला आश्चर्यचकीत करणारी जादुई ताकद असून ज्याद्वारे चीनला सावधान म्हटले जात आहे.

चीनच्या इलाक्यात युद्धाभ्यास

हा युद्धाभ्यास ऑस्ट्रेलियाच्या क्वींसलँडमध्ये होत आहे. आणि पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाच्या बाहेर पापुआ न्यु गिनीतही होत आहे.याचा प्रभाव कोरल सागर आणि दक्षिण-पश्चिम प्रशांत क्षेत्राच्या ज्या भागात आहे. जेथे चीनच्या हालचाली सुरु आहेत. भारत, अमेरिका,ऑस्ट्रेलिया, जपान आणि द.पूर्व आशियापासून साऊथ पॅसिफिकच्या द्वीपीय देशांपर्यंत सर्व यात सामील आहेत. याचा संदेश साफ आहे की नियम आधारित समुद्री व्यवस्था आणि सार्वभौमत्वाचं संरक्षण करणे

चीनचा विस्तारवाद

चीन नेहमीच या देशांच्या बेटांवर दावा करत आहे. दक्षिणी चीन सागरात फिलीपाई्न्स व्हीएतनाम, मलेशिया आणि ब्रुनेईच्या अनेक भाग असो वा सोलोमन आयसलँड आणि पाप्युआ गिनी सारखे छोटे देश, प्रत्येक जागी चीनच्या विस्तारवादी दृष्टी पडलेली आहे. मात्र या युद्धसरावाने हा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे की हिंद-प्रशांत सागर कोणा एका देशाच्या मालकीचा नसुन सर्वांचा आहे.

शस्रास्रांचे प्रदर्शन

१९ देशांच्या आणि ४० हजार सैनिकांच्या या युद्ध सरावाकडे चीनचेही लक्ष आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच ४०० किलोमीटरची रेंजवाली HIMARS आणि प्रिसिजन स्ट्राईक क्षेपणास्त्रांची लाईव्ह-फायर चाचणी घेतली. जपानने टाईप ३ मध्यम-श्रेणीच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. दक्षिण कोरियाने K-1 टँक आणि K9A2 स्व-चालित हॉवित्झरचे प्रात्यक्षिक दाखवले. तर अमेरिकेच्या F-35 B लढाऊ विमानांनीही यात सहभाग घेतला आहे. भारत पहिल्यांदाच यात सहभागी होऊन चीनला मोठा संदेश देत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.