Retirement : मॅचविनर ऑलराउंडरकडून निवृत्तीची घोषणा, 2 सामन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार
GH News July 17, 2025 03:06 AM

क्रिकेट विश्वात सध्या कसोटी मालिकेचा थरार पाहायला मिळत आहे. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर आहे. टीम इंडिया 5 सामन्यांच्या मालिकेत 1-2 अशा फरकाने पिछाडीवर आहे. तर उभयसंघातील चौथा सामना हा 23 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. तर दुसऱ्या बाजूला वेस्ट इंडिजला मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका गमावण्याची वेळ आली. ऑस्ट्रेलियाने विंडीजला कसोटी मालिकेत 3-0 ने व्हाईटवॉश केलं. त्यानंतर आता विंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 टी 20i सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.

विंडीज क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या मालिकेतून विंडीजचा स्टार ऑलराउंडर आंद्रे रसेल याचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मात्र रसेलने या मालिकेदरम्यान निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का आहे.

ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी वेस्टइंडिज टीम : शाई होप (कर्णधार), ज्वेल एंड्रयू, जेडिया ब्लेड्स, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, अकील हुसैन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, एविन लुईस, गुडाकेश मोती, रोवमॅन पॉवेल, आंद्रे रसेल, शेरफेन रूदरफोर्ड आणि रोमारियो शेफर्ड.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.