इस्रायलच्या जबरदस्त हल्ल्यांनी सीरियाचं कंबरडं मोडलं आहे. इस्रायली एअरफोर्सने अचूक आणि भीषण हल्ले केले. त्यानंतर सीरियाच्या अधिकृत वृत्तसंस्थेकडून, सैन्याच्या हस्तक्षेपाने ड्रूज बहुल स्वेदा शहरात सीजफायर झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याआधी इस्रायलने अनेक हल्ले करुन सीरियाची राजधानी दमिश्कला हादरवून सोडलं. त्याशिवाय स्वेदा शहरातील सीरिया फोर्सच्या तुकडीला टार्गेट करुन अनेक रणगाडे उद्धवस्त केले. सीरियाच्या स्वेदा शहरात ड्रूज समुदायाची मोठी लोकसंख्या आहे. या शहरात ड्रूज आणि बैदोइन समुदायात मागच्या चार दिवसांपासून हिंसाचार सुरु होता. यात जवळपास ड्रूज समुदायाचे 300 नागरिक मारले गेले आहेत. सीरियाची सुरक्षा पथक सुद्धा ड्रूज समुदायावर हल्ले करत आहेत असं प्रत्यक्षदर्शीनी सांगितलं. त्यानंतर बुधवारी इस्रायल-सीरिया बॉर्डरवर परिस्थिची चिघळली. इस्रायलने थेट दमिश्कवर हल्ले केले.
सैन्याच मुख्यालय, संरक्षण मंत्रालयासह सीरियाच्या अनेक शहरात जवळपास 160 ठिकाणांना टार्गेट करण्यात आला. सीरियन सैन्याचे अनेक रणगाडे नष्ट करण्यात आले. सैन्य तळ उडवण्यात आले. सीरियाकडून घोषणा करण्यात आली आहे की, स्वेदामध्ये स्थिती सामान्य होण्याच्या मार्गावर आहे. ड्रूज आणि बैनेदोई समुदायात सीजफायर झालं आहे.
आम्ही लढत राहणार
ड्रूज बहुल स्वेदा शहरात युद्धविराम झाल्याची घोषणा सीरियाच्या अधिकृत वृत्तसंस्थेने केली आहे. एजन्सीनुसार सरकारकडून स्वेदामध्ये तपासणी चौक्या बनवल्या जात आहेत. सीरियामधील ड्रूज नेता शेख युसुफ जार्बू यांच्या हवाल्याने अरबी मीडियामध्ये एक व्हिडिओ संदेश प्रसारीत झाला आहे. त्यात युद्धविरामाच्या अटी सांगण्यात आल्या आहेत. आम्ही दहशतवाद्यांशी तो पर्यंत लढत राहू, जो पर्यंत आम्ही आमची जमीन त्यांच्या ताब्यातून मुक्त करत नाही असं ड्रूज पेजवर प्रसिद्ध झालेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. स्वत:ला सरकार म्हणणाऱ्या या गटांसोबत कुठलीही तडजोड होणार नाही. स्वेदामध्ये सीजफायर झाल्याच्या बातम्या आल्यानंतर हे स्टेटमेंट आलं आहे. ड्रूज शेख हिकमत अल हिजरी यांनी या कराराला विरोध केला आहे. आम्ही लढत राहणार असं त्यांनी म्हटलं आहे.
सीरियाई राष्ट्रपति भवनाजवळ हल्ला का?
इस्रायली हल्ल्यात सीरियन सैन्याच भरपूर नुकसान झालं आहे. अनेक वाहन नष्ट झाली आहेत. हिंसक झडपारोखण्यासाठी स्वेदा भागात सैन्य तैनात करण्यात आलं आहे. आयडीएफने सांगितलं की, सोमवारी 160 पेक्षा जास्त ठिकाणी हल्ले करण्यात आले. यात बहुतांश स्वेदामध्ये होते. सीरियाची राजधानी दमिश्क येथे जनरल स्टाफ कमांड भवन आणि सीरियाई राष्ट्रपति भवनाजवळ इस्रायलने हल्ले केले. सैन्य आणि संरक्षण मंत्रालयाजवळ हल्ला यासाठी करण्यात आला कारण सैन्य पाठवण्याचा आदेश तिथूनच देण्यात आला होता.