भारत आणि इंग्लंड कसोटी मालिका आता निर्णायक वळणावर पोहोचली आहे. इंग्लंडने आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात 2-1 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतावरचा दबाव वाढला आहे. त्यामुळे मालिका वाचवायची असेल तर चौथा सामना भारताला काहीही करून जिंकावाच लागेल. अन्यथा मालिका हातून जाईल तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेतही मोठं नुकसान होईल. त्यामुळे हा सामना भारतासाठी खूपच महत्त्वाच आहे. या सामन्यापूर्वी अजिंक्य रहाणे याने एक कमकुवत बाजू मांडली आहे. यामुळे टीम इंडियाचं नुकसान होऊ शकतं. अजिंक्य रहाणे याने सांगितलं की, जर टीम इंडियाला हा सामना जिंकायचा असेल तर एक अतिरिक्त गोलंदाज घ्यावा लागेल. कारण गोलंदाजच तुम्हाला कसोटी मालिका आणि कसोटी सामने जिंकवतात, असं अजिंक्य रहाणेने सांगितलं.
अजिंक्य रहाणे याने त्याच्या युट्यूब चॅनेलवर सांगितलं की, ‘आपल्याला सर्वांना माहिती आहे की, चौथा आणि पाचवा दिवस फलंदाजीसाठी कठीण असतो. या दिवशी धावा करणे सोपं नसते. इंग्लंडने चांगली गोलंदाजी केली. पण मला वाटते की लॉर्ड्सवरील पहिल्या डावात भारतीय संघ जास्त धावा करू शकली असती. जर मी ते पुढे नेले तर टीम इंडियाने संघात एक अतिरिक्त गोलंदाज जोडावा कारण गोलंदाज कसोटी सामने आणि मालिका जिंकतात. तुम्ही हे फक्त 20 विकेट्स घेऊन करू शकता.’
अजिंक्य रहाणे याच्या सूचनेनंतर भारतीय संघात एका अतिरिक्त गोलंदाजाला संधी मिळेल का? हे नाणेफेकीचा कौल झाल्यानंतरच स्पष्ट होईल. कुलदीप यादवला संधी मिळेल की नाही? याबाबत चर्चा आहे. पण इंग्लंडमधून येणाऱ्या अहवालांनुसार, टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फार काही बदल केला जाणार नाही. फक्त एकच बदल होऊ शकतो यात करुण नायरला वगळून ध्रुव जुरेलला संधी मिळू शकते. कारण पंत हा काही विकेटकिपिंग करू शकत नाही. त्यामुळे जुरेल विकेटकीपिंग करू शकतो. तसेच कुलदीपला संधी मिळाली तर ती फक्त वॉशिंग्टन सुंदरच्या जागी संघात येईल.