नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या दरात आज देखील घसरण पाहायला मिळाली. सर्राफा बाजारात सोन्याचे दर घसरले आहेत. सोन्याच्या बाजारात एका तोळ्याचे दर 145 रुपयांनी घसरले. चांदीच्या दरात देखील 104 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. जीएसटीसह 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 101697 रुपये आहे. तर, चांदीचा दर 118437 रुपये आहे. गुरुवारी चांदीचे दर जीएसटीशिवाय 115092 रुपये किलो होते. सोन्याचे दर 98880 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
गेल्या तीन दिवसात 24 कॅरेट सोन्याचे दर 100533 रुपयांवरुन घसरुन 98735 रुपयांवर आले आहेत. या तीन दिवसात सोन्याचे दर 1798 रुपयांनी घसरले आहेत. त्याचवेळी चांदीचे दर 862 रुपयांनी घटले आहेत. चांदीचे दर 23 जुलै 2025 दर 115850 रुपांपर्यंत पोहोचले होते.
जुलै महिन्यात सोन्यापेक्षा चांदीच्या दरात वेगानं वाढ झाली. सोन्याचा दर 2849 रुपयांनी वाढले. तर, एक किलो चांदीच्या दरात 9582 रुपयांची वाढ झाली. आयबीजेएच्या रेटनुसार 30 जूनला एक तोळा सोन्याचे दर 95886 रुपये होते. तर चांदीचे दर 105510 रुपये किलो होते.
सोने आणि चांदीचे दर इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन म्हणजेच आयबीजेएकडून जारी केले जातात. आयबीजेकडून जारी केल्या जाणाऱ्या दरात जीएसटीचा समावेश केल्यास 1000 ते 2000 रुपयांचा फरक पाहायला मिळू शकतो. आयबीजेएकडून एका दिवसात दोनवेळा सोन्याचे दर जाहीर केले जातात.
2025 मध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सर्राफा बाजारात एक तोळा सोन्याचे दर 22995 रुपयांनी वाढले आहेत. तर एक किलो चांदीचा दर 28971 रुपयांनी वाढला आहे. 31 डिसेंबर 2024 ला सोन्याचा दर 76045 रुपये एक तोळा होता. तर, चांदीचा दर त्यावेळी 85680 रुपये होता.
आणखी वाचा