भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना क्रिकेटची पंढरी म्हणून ख्याती असलेल्या लॉर्ड्सवर सुरु आहे. या सामन्यातील दुसरा दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर जो रूटने शतक ठोकलं. (फोटो- ECB Twitter)
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने 4 गडी गमवून 251 धावा केल्या होत्या. तसेच जो रूट नाबाद 99 धावांवर होता. दुसऱ्या दिवशी त्याने पहिल्या चेंडूवर चौकार मारला आणि शतक पूर्ण केलं. (GETTY IMAGES)
जो रूटने 192 चेंडूत 10 चौकारांसह आपल्या कसोटी कारकिर्दीतील 37 वे शतक पूर्ण केले. रूटने टीम इंडियाविरुद्ध झळकावलेले हे 11 वे कसोटी शतक आहे.(GETTY IMAGES)
या शतकासह अनेक विक्रम रचणाऱ्या जो रूटचे लॉर्ड्स मैदानावर हे आठवे शतक आहे. या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताविरुद्ध कसोटीत 3000 धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला. (GETTY IMAGES)
लॉर्ड्सवर शतक झळकावून त्याने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाचीही बरोबरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या पाच स्थानावर पोहोचला आहे.(GETTY IMAGES)
जो रूटने एकाच देशाविरुद्ध सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे. सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 11 शतके ठोकली आहेत. या यादीत डॉन ब्रॅडमन अव्वल स्थानावर आहेत ज्यांनी इंग्लंडविरुद्ध 19 शतके ठोकली आहेत. (GETTY IMAGES)
जो रुटचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 55 वे शतक आहे. तर कसोटी क्रिकेटमधील 37 शतके केली आहेत. यासह त्याने भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथला मागे टाकले आहे. या दोघांच्या नावावर 36 शतके केली आहेत. (फोटो- ECB Twitter)