ब्राझील : ब्राझीलच्या ईशान्येकडील बाकाबल शहरात एका बेपत्ता मुलीच्या शोध मोहिमेदरम्यान धक्कादायक (Brazil Shocking Incident) घटना घडली. बेपत्ता मुलीच्या प्रकरणाचे लाईव्ह रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराच्या पायाखालीच त्या मुलीचा मृतदेह आला आणि हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाल्याने व्हिडिओ सोशल मीडियावर (Brazil Journalist Viral Video) जोरदार व्हायरल झाला आहे.
पाण्यात उतरताच पायाखाली आला मृतदेहलेनाल्डो नावाचा पत्रकार बेपत्ता रायसा या तरुणीच्या शोध मोहिमेचे थेट प्रक्षेपण करत होता. रिपोर्टिंगदरम्यान तो पाण्यात उतरला आणि अचानक त्याच्या पायाखाली काहीतरी आल्याने तो घाबरून बाहेर आला. तपासल्यावर कळाले, की ते रायसाचेच शव होते.
धक्कादायक! 'तू मला रक्त आणि काळीज दे, मी तूला बायको मिळवून देतो'; मांत्रिकाचा राक्षसी सल्ला, 6 वर्षीय पुतण्याचा घेतला बळी तात्काळ बाहेर काढला शवघटनेनंतर अग्निशमन दल आणि डायव्हर्सच्या पथकाने तत्काळ शोध मोहीम पुन्हा सुरू केली आणि पत्रकार जिथे उभा होता, तिथेच रायसाचा मृतदेह मिळाला. शव बाहेर काढल्यानंतर तात्काळ शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
शवविच्छेदन अहवालानुसार, रायसाचा मृत्यू बुडून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमांचे निशाण आढळले नाहीत. त्याच दिवशी रायसावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, लाईव्ह रिपोर्टिंगदरम्यान घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.