पेन्शन अदालतमध्ये ५२ अर्ज निकाली
अलिबाग (वार्ताहर) ः रायगड जिल्हा परिषदेच्या मार्फत पेन्शन अदालात घेण्यात आली. या वेळी ५२ अर्ज निकाली काढण्यात आले. पेन्शन अदालतमध्ये विविध विभागांचे एकूण १०४ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अर्ज प्रलंबित होते. यामधील ५२ अर्ज निकाली काढण्यात आले. तसेच लोकअदालतमध्ये ४२ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्व प्रलंबित अर्ज पुढील काही दिवसांत निकाली काढण्याचे आश्वासन जिल्हा परिषद प्रशासनाने दिले आहेत. या वेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण, बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, अर्थ, आरोग्य, ग्रामपंचायत, पशुसंवर्धन विभागांमधील प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे यांच्या उपस्थितीत पेन्शन अदालत पार पडली.