हिंदू धर्मात वास्तुशास्त्राचं महत्त्व सांगण्यात आलं आहे. यात जल, अग्नि, पृथ्वी वायू आणि आकाश तत्वाशी निगडीत वस्तूंचा आणि दिशांचा अभ्यास मांडण्यात आला आहे. त्यामुळे वास्तुत प्रत्येक वस्तूचं एक स्थान आहे. त्यामुळे वस्तू इकडची तिकडे झाली की काही ना काही संकट कोसळतं, असं वास्तुशास्त्र सांगतं. वास्तुशास्त्रानुसार, ज्या घरात स्वच्छता असते त्या घरात देवी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे घरात कायम स्वच्छता ठेवावी. त्यात झाडू देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जाते. त्यामुळे घरात झाडू योग्य दिशा आणि स्थानी ठेवणं फायद्याचं ठरतं. त्यामुळे घरात सुख समृद्धी राहते आणि आर्थिक अडचणीही दूर होतात. झाडू ठेवण्याची दिशा आणि स्थान चुकीचं असेल तर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे योग्य दिशा आणि स्थान माहिती असणं आवश्यक आहे. चला जाणून घेऊयात वास्तुशास्त्र
वास्तुशास्त्रानुसार, झाडू ठेवण्याची योग्य दिशा दक्षिण-पश्चिम मानली गेली आहे. धार्मिक श्रद्धा आणि वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण दिशेला झाडू ठेवल्याने घरात प्रसन्न वातावरण राहतं. तसेच देवी लक्ष्मीची कृपा होते. येणाऱ्या अडचणीही दूर होतात. त्यामुळे या दिशेला झाडू ठेवणं फायद्याचं ठरतं. तर तुम्हाला या दिशेला झाडू ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही पश्चिम दिशेला झाडू ठेवू शकता. या ठिकाणी झाडू ठेवणं शुभ मानलं जातं. तसेच झाडू ईशान्य, उत्तर, पूर्व, आग्नेय दिशेस ठेवू नये. यामुळे घरात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच घरात वास्तुदोषही निर्माण होऊ शकतो.
दरम्यान, झाडू बेडरूम, पूजा घर आणि स्टोर रूमध्ये ठेवू नये. या ठिकाणी झाडू ठेवणं उचित मानलं जात नाही. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा प्रभावित होते. इतकंच काय तर झाडू मारताना किंवा ठेवली असताना ती ओलांडता कामा नये. इतकंच काय तर घरात झाडू ठेवताना त्यावर कोणाची नजर पडणार नाही अशा ठिकाणी ठेवावी.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)