Ravindra Chavan on Rahul Gandhi: पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये दम नाही त्यांची नुसती शोबाजी असते. मीडियानंच त्यांना मोठं केलं आहे, अशा शब्दांत लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी सडकून टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे. संविधान बचावची शोबाजी करणाऱ्यांना जनतेनं केव्हाचं ओळखलंय अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधींवर पलटवार केला आहे.
रविंद्र चव्हाण यांनी ट्विट करत म्हटलं, होय! आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे 'Problem' नाहीतच! सन १९७१ पासून काँग्रेस 'रोटी, कपडा, मकान'च्या भूलथापा मारत होती, पण मोदींच्या नेतृत्त्वात केवळ ११ वर्षांत देशात आणि पर्यायानं स्वतःच्या आयुष्यात घडणारा कायापालट देशवासियांनी फार जवळून बघितला आहे. तब्बल २५ कोटींपेक्षा जास्त भारतीयांनी दारिद्र्यरेषा ओलांडली आहे. म्हणूनच कायम सत्ताधीशाच्या मग्रुरीत राहिलेल्या काँग्रेसचा अहंकाराचा 'गुब्बारा' जनतेनं वारंवार फोडला. मात्र, सुंभ जळाला तरी पीळ जात नाही! राष्ट्रसेवक मोदीजींना काँग्रेसचे शहजादे राहुल गांधी यांनी 'गुब्बारा' म्हणणं हे याच अहंकारातून येतं. हातात कोरी पानं घेत 'संविधान बचाव' ही 'शो'बाजी करणारे 'मीडिया का गुब्बारा' कोण? हे सुज्ञ जनतेने केव्हाच ओळखलंय, एवढंच राहुल गांधी यांनी लक्षात ठेवावं"
Students Death : नैराश्यामुळं विद्यार्थी संपवताहेत स्वतःचं जीवन! सुप्रीम कोर्टानं जारी केली मार्गदर्शक तत्त्वे! केंद्राला कायदा करण्याचे आदेश, तोपर्यंत...दरम्यान, नवी दिल्लीत शुक्रवारी ओबीसींच्या संमेलनात बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली होती. ते म्हणाले होते की, "नरेंद्र मोदी हे काही मोठा समस्या नाहीत. मी तुम्हाला सांगतो लोकांनी त्यांना डोक्यावर चढवून ठेवलं आहे. मीडियावाल्यांनी मोदींचा फुगा बनवलाय आहे फक्त, बाकी त्यांची काहीही अडचण नाही. आधीतर मी त्यांना कधी भेटलो नव्हतो पण आता दोन-तीन वेळा मी त्यांना भेटलो आहे. त्यांची गोष्ट मला आता कळाली आहे, काहीही खास नाही त्यांच्यात. फक्त शोबाजी आहे, दम नाही त्यांच्यात. तुम्ही त्यांना भेटलेले नाहीत, मी भेटलो आहे. खोलीत बसून त्यांच्याशी गप्पा मारल्यात मी"