वाशिम जिल्ह्यातून अकोला-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी सुरू असलेल्या चार पदरी रस्त्याचं काम गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून पूर्णपणे ठप्प आहे. या महामार्गावर एका बाजूला ठेकेदाराने खोदलेला रस्ता, तर दुसऱ्या बाजूला मोठमोठे खड्डे अशा गंभीर परिस्थितीत वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
Raigad : इंदापूर तळा मार्गावर बर्निंग कारचा थराररायगडच्या इंदापूर तळा मार्गावर रात्री बर्निंग कारचा थरार पहायला मिळाला. मुठवली गावाजवळ धावत्या कारने अचानक पेट घेतला. यात कार जळून खाक झाली असून सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. कारचालकाच्या लक्षात येताच तो बाहेर पडला.
Ratnagiri news : रत्नागिरीत उपमुख्यमंत्री शिंदे अन् गृहाराज्यमंत्री योगेश कदम यांचा दौरारत्नागिरीत आज मंत्र्यांचे दौरे असणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खेडमध्ये असणार आहेत. खेडमधील स्व.मिनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचं लोकार्पण उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या सोबत गृहराज्यमंत्री योगेश कदम देखील असणार आहेत. तर रत्नागिरीतील मिरकडवाडा बंदराच्या कामाचं भूमीपूजन बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत देखील उपस्थित असणार आहेत.
Maharashtra Rain : राज्यात पावसाचा जोर वाढला, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात मुसळधारराज्यात पावसाचा जोर वाढला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालीय. मराठवाड्यालाही पावसानं झोडपलंय. तर कोल्हापूर सांगलीत पावसाची संततधार सुरू असून धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. काही धरणांमधून विसर्ग सुरू आहे.