Solapur News : आमच्या सत्कारापेक्षा तुमचाच सत्कार करू : अध्यक्ष शिवानंद पाटील
esakal July 27, 2025 09:45 PM

मंगळवेढा : दामाजी कारखान्यावरील सत्ता बदलानंतर महत्वाच्या ठिकाणी आपल्या मर्जीतील कर्मचारी ठेवतात मात्र तीन वर्षाच्या कार्यकाळात आम्ही कुणाचीही अदलाबदल केली नाही जो कारभार केला तो समोर आहे.त्यामुळे आमच्या सत्कारापेक्षा भविष्यातील कारखाना चांगला चालवून दाखवा आम्ही तुमचा सत्कार करू असे आवाहन दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी केले.

समविचारी आघाडीच्या माध्यमातून दामाजी कारखान्यावर सत्ता स्थापन केलेल्या केलेल्या अध्यक्ष शिवानंद पाटील, उपाध्यक्ष तानाजी खरात यांच्यासह संचालक मंडळाच्या कारकिर्दीला तीन वर्षे यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल कामगार संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित केला होता मात्र त्यांनी हा सत्कार टाळत भविष्यात कारखान्याचे व्यवस्थापन चांगले करावे यावर त्यांनी मार्गदर्शन करत अध्यक्ष पाटील म्हणाले की, आम्ही कर्मचाऱ्या प्रती कोणतीही सुडाची भावना ठेवली नाही.

मागील संचालक मंडळ थकीत एक पगार व भविष्य निर्वाह निधीचे सात कोटी अदा केले आहेत तर सेवानिवृत्त कर्मचारी रक्कम देखील टप्प्याटप्प्याने देत आहोत कारखान्यावरील असलेल्या कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी प्रयत्न देखील आमच्या संचालक मंडळाने केला आहे.सध्या स्पर्धक कारखानदारांची संख्या देखील जास्त आहे अशा परिस्थितीत दामाजीकडे कोणताही प्रकल्प नसताना देखील गाळप केलेल्या शेतकऱ्यांच्या उसाची बिले वेळेत देण्याचा प्रयत्न केला. अडचणीच्या काळात देखील दामाजीकडे गतवर्षीच्या हंगामात दोन लाख 81 हजार चे गायब झाले.

गतवर्षीच्या हंगामात दामाजीने शेतकऱ्यांची बिले वेळेत दिल्यामुळे दामाजीवरील विश्वास शेतकऱ्यांचा वाढला. त्यामुळे यंदा अपेक्षेपेक्षा जास्तीचे गाळप करण्याच्या दृष्टीने आमचे संचालक मंडळ मार्गदर्शक प्रशांत परिचारक,भगीरथ भालके, प्रा. शिवाजीराव काळुंगे, रामकृष्ण नागणे,शशिकांत बुगडे, नंदकुमार पवार,दामोदर देशमुख, राहुल शहा,यादाप्पा माळी यांना मार्गदर्शकाच्या नेतृत्वाखाली प्रयत्नशील आहे.

यावेळी उपाध्यक्ष तानाजी खरात, संचालक मुरलीधर दत्तु,गोपाळ भगरे,राजेंद्र पाटील भारत बेदरे,दया सोनगे, रेवणसिध्द लिगाडे, औदुंबर वाडदेकर, लता कोळेकर, बसवराज पाटील, भिवा दौलतोडे, दिगंबर भाकरे,महादेव लुगडे,तानाजी कांबळे,निर्मला काकडे, अशोक केदार आदी संचालक उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.