दाराच्या मागे कपडे अडकवल्याने घरात काय अडचणी येतात?
Tv9 Marathi July 27, 2025 11:45 PM

अनेक लोक दरवाजाच्या मागे कपडे अडकवतात किंवा अनेकांच्या दारामागे कपड्यांचं हूक अडकवलेले असतं त्याला बॅग, छत्री किंवा छोटे-मोठे कपडे अडकवले जातात. पण वास्तूशास्त्रानुसार असं करणं अशुभ मानलं जातं. कारण त्यामुळे घरात अडचणी निर्माण होऊ शकतात असं म्हटलं जातं. तसेच वास्तुचे काही नियम आहेत जे पाळले तर तुमचे जीवन सुधारू शकते असंही म्हटलं जातं. काही लोक वास्तुचे नियम पाळतात परंतु कधीकधी अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे चांगल्या घरात कलहाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

दारांमागे कपडे अडकवणे  वास्तुशास्त्रात चुकीचे मानले जाते

वास्तुशास्त्रात स्वयंपाकघरापासून बेडरूमपर्यंत आणि बाथरूमपासून बाल्कनीपर्यंत अनेक नियम सांगितले आहेत. त्याच वेळी, घराच्या दारांबाबत अनेक नियम सांगितले आहेत. बरेच लोक या दारांमागे कपडे अडकवताना दिसतात. पण ही गोष्ट वास्तुशास्त्रात चुकीचे मानली जाते. पण यामागे नक्की काय कारण आहे हे जाणून घेऊयात.

दारावर कपडे का अडकवू नये?

वास्तुशास्त्रानुसार, लक्ष्मी माता दाराच्या वरच्या भागात वास करते असं म्हटलं जातं. असे मानले जाते की देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमी वरच्या भागात असते. दारावर लटकवेल्या कपड्यांमुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद लाभत नाही असं म्हटलं जातं. शास्त्रांनुसार, असे केल्याने घरात आर्थिक टंचाईची परिस्थिती निर्माण होते. हळूहळू प्रत्येक काम अडकू शकते आणि पैशाचे नुकसान होते. असेही मानले जाते की असे केल्याने घराची शांती भंग होते. दारावर कपडे अडकवणे योग्य नाही कारण त्यामुळे घराची सकारात्मक ऊर्जा हळूहळू नकारात्मकतेत बदलते. तसेच घरात कलह निर्माण होऊ शकतात.

कपडे कुठे अडकवणे योग्य?

वास्तुशास्त्रात कपडे योग्यरित्या अडकवण्याचा उल्लेख आहे. पश्चिम आणि दक्षिण दिशेला कपडे अडकवणे योग्य आहे. तुम्ही कधीही पूर्व आणि उत्तरेकडे कपडे अडकवू नये. तुम्ही कपडे कुठेही अडकवू शकता पण त्यासाठी कधीही दरवाजा निवडू नये. अशा परिस्थितीत वास्तुचे काही नियम तुमचे जीवन सुधारू शकतात. असे केल्याने एक तर घर स्वच्छ दिसेल तसेच वास्तुमुळे होणाऱ्या दोषांपासूनही तुम्ही वाचू शकाल.

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.