पिंपरी : प्रत्येकाला जगण्यासाठी प्राणवायू अर्थात ऑक्सिजनची गरज असते, आणि तो देण्याचे काम झाडे म्हणजेच वृक्ष करत असतात, हे सर्वमान्य आहे. मात्र, शहरीकरणामुळे अनेक ठिकाणी झाडे तोडली जातात आणि प्रदूषणवाढीला वाव मिळतो. त्याचा कळत-नकळतपणे सर्वांवर परिणाम होतो. त्यापासून वाचण्यासाठी झाडे लावणे आवश्यक आहे. म्हणूनच ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘यशदा रिॲलटी’ यांच्या संयुक्त विद्यमाने २४ ऑगस्ट रोजी वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात येणार आहे.
संत ज्ञानेश्वर माउली असोत की जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्यासह सकल संतांनी निसर्गाचे अर्थात झाडांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. शिवाय, यावर्षी संत ज्ञानेश्वर माउली यांचा ७५० वा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराज यांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळा यावर्षी साजरा केला जात आहे. याचे औचित्य साधून ‘यशदा रिॲलटी’ आणि ‘सकाळ माध्यम समूहा’ने वृक्षारोपणाचा संकल्प केला आहे. त्यामध्ये सर्वांना सहभागी करून घेण्याचा उद्देश आहे.
वृक्षारोपण-संवर्धनाचा वसा‘यशदा रिॲलिटी’ हे बांधकाम क्षेत्रातील नामांकित नाव आहे. ग्राहकांना परवडतील असे गृहप्रकल्प उभारून त्यांच्या स्वप्नातील घरे उपलब्ध करून द्यायचे, हा त्यांचा प्रमुख उद्देश असला तरी, निसर्गाचे व समाजाचे आपण काही तरी देणे लागतो, या भावनेतून ‘वृक्षारोपण आणि संवर्धनाचा’ वसा त्यांनी घेतला आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’ची साथ त्यांना लाभली आहे. ‘एक सदनिका, एक झाड’ अर्थात ‘एक कुटुंब, एक झाड’ अशी ही संकल्पना आहे.
तीन वर्षे राखणार निगाकेवळ वृक्षारोपण करायचे नसून, पुढील तीन वर्षे त्याचे संगोपन व संवर्धनही केले जाणार आहे. त्यासाठी नैसर्गिक खत, पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. जनावरांपासून संरक्षणासाठी प्रत्येक रोपाची निगा राखली जाणार आहे. ‘यशदा रिॲलटी’च्या ग्राहकांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत वृक्षारोपण केले जाणार आहे. सुमारे दोन हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे. शिवाय, यापूर्वी विक्री केलेल्या सदनिकाधारकांच्या हस्तेही वृक्षारोपण केले जाणार आहे.
काय? कधी?
काय? ः ‘MyTree-मैत्री’ वृक्षारोपण व संवर्धनाचा संकल्प
कधी? ः २४ ऑगस्ट २०२५
अधिक माहितीसाठी संपर्क ः
अक्षय - ९५६१३१४६७९