पंतप्रधान पीक विमा योजना 2025 खरीप हंगामासाठी पीक विमा नोंदणी सुरू झाली आहे! या योजनेची अंतिम तारीख 31 जुलै आहे.
पंतप्रधान पीक विमा योजना 18 फेब्रुवारी 2016 रोजी सुरू झाली. या योजनेचा
उद्देश नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीवर शेतकऱ्यांचे संरक्षण करणे.
अधिसूचित क्षेत्रातील सर्व शेतकरी मालक, भाडेकरू (पट्टेदार) किंवा बटाईदार शेतकरी अर्ज करु शकतात.
खरीप हंगामासाठी फक्त 2% प्रीमियम शेतकऱ्यांना भरावा लागतो. उर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकार भरते.
पासपोर्ट साईज फोटो, बँक पासबुक, जमीन नोंद प्रमाणपत्र किंवा भाडेकरार,
आधार / पॅन / ओळखपत्र, पत्ता पुरावा, पिकाची घोषणा.
अधिसूचित क्षेत्राबाहेर पिकवलेले पीक, कापणीनंतर झालेली हानी, आधीच मुआवजा घेतलेले नुकसान.
अल्पमुदतीचे कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना हा विमा बँकेमार्फत अनिवार्य आहे.